कपिल शर्माचा शो पुन्हा रुळावर

कपिल शर्माचा शो पुन्हा रुळावर

बार्कच्या नव्या आकडेवारीनुसार कपिलचा शो पुन्हा टॉप 5 टी.आर.पी असलेल्या शोंच्या यादीत आलाय.

  • Share this:

09 जून : कपिलच्या  प्रचंड गाजलेल्या  शोवर गेल्या काही दिवसांपासून  काळ्या ढगांचं सावट होतं.त्याच्या शोची व्ह्यूअरशीप  70 लाखावरून 39लाखावर  घसरली. टी.आर.पी आपटला. एवढंच काय तर सलमानचा दस का दम त्याच्या शोला रिप्लेस करतो की काय इतपत अफवाही उठल्या. पण बार्कच्या नव्या आकडेवारीनुसार कपिलचा शो पुन्हा टॉप 5  टी.आर.पी  असलेल्या शोंच्या यादीत आलाय.

काही दिवसांपूर्वी या शोने 100 एपिसोड्सचा पल्लाही ओलांडला.पण कपिल-सुनीलचं झालेलं भांडण,त्यानंतर सुनीलने शो सोडणं यामुळे  शोवर वाईट परिणाम झाला होता.आता शो पुन्हा त्याची लोकप्रियता गाठेल की नाही यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह होते.

पण आता कपिलला घाबरायचं  कारण नाही . बार्कच्या नव्या आकडेवारीनुसार कपिलचा शो पुन्हा टॉप 5  टी.आर.पी  असलेल्या शोंच्या यादीत आलाय. ही माहिती शोमधील कॉमेडीयन किकू शारदाने ट्विट केलीय.

आता शो पुन्हा रुळावर आलाय तर खरा पण तो त्याची लोकप्रियता किती टिकवेल  आणि किती वाढवेल हे येणारा काळच ठरवेल.

First published: June 9, 2017, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading