मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कपिलचा अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप; म्हणाला, 'KBC मध्ये फक्त सुंदर मुलींना...'

कपिलचा अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप; म्हणाला, 'KBC मध्ये फक्त सुंदर मुलींना...'

कौन बनेगा करोडपती 13  (Kaun Banega Crorepati 13)  बद्दलचा आपला अनुभव शेअर करताना कपिल शर्माने  (Kapil Sharma) अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून सगळेच थक्क झाले.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 20 डिसेंबर- कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या शानदार कॉमेडीद्वारे लाखो हृदयांवर राज्य करतो. कपिल आपल्या 'द कपिल शर्मा शो'मध्येही (The Kapil Sharma Show) येणाऱ्या पाहुण्यांसोबत खूप मस्ती करतो . तसेच त्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तसेच तो कुठेही गेला तरी लोकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. कपिल शर्माने अमिताभ बच्चन यांच्या क्विझ रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 13' (Kaun Banega Crorepati 13)’ मध्ये बॉलीवूड अभिनेता सोनू सूदसोबत (Sonu Sood) भाग घेतला होता. जिथे त्याने बिग बींसोबत खूप मस्ती केली होती.

कौन बनेगा करोडपती 13 बद्दलचा आपला अनुभव शेअर करताना कपिल शर्माने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून सगळेच थक्क झाले. कपिल शर्मा म्हणतो की, अमिताभ बच्चन शोमध्ये येणाऱ्या सुंदर महिलांना साधे प्रश्न विचारतात. कपिलचे हे वक्तव्य ऐकून खुद्द अमिताभ बच्चनही चकित झाले.

वाचा-बिग बॉस मराठीच्या चावडवीर स्पेशल गेस्ट; स्पर्धक थिरकणार त्याच्या तालावर

खरंतर, या शनिवारच्या एपिसोडमध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये रवी किशन, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी पाहुणे म्हणून पोहोचले होते. सचिन खेडेकर यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या मराठी आवृत्तीबद्दल कपिल बोलत होता. या चर्चेदरम्यान कपिलने KBC 13 चा अनुभव शेअर केला.

कपिल म्हणतो- 'मला केबीसीमध्ये जाण्याची संधी मिळाली. पहिले म्हणजे सेटचे वातावरण आणि संगीत खूप गंभीर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमिताभ सर तुमच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहतात. अमिताभ सर तुम्हाला म्हणतात- 'सर, मी तुमच्याकडे पाहत नाही, मी तुम्हाला मदत देखील करू शकत नाही.' त्यांचा आवाज असा आहे की, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्याचवेळी तुमच्या पोटात गुड-गुड होत असते.

वाचा-Video- सलमान खानला घाबरली सनी लिओनी; म्हणाली, 'थप्पड मत मारो..'

कपिल पुढे म्हणतो- 'पण मी एक गोष्ट पाहिली आहे की, सोनालीसारखी सुंदर मुलगी गेली की बच्चन साहेबांचे प्रश्न वेगळे असतात. 'गुलाबाच्या फुलाचा रंग कोणता?' आणि आपणल्यासारखे कोण गेले तर, 'हुमायूं कधी आले होते?' हे जरी आपण सांगितले तरी ते कोणत्या वर्षी आले, कोणत्या दिवशी आले? चला तर मग, किती वाजता आले होते?'' हे ऐकून सगळे जोरजोरात हसू लागले.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Kapil sharma, The kapil sharma show, TV serials