News18 Lokmat

कपिल शर्मानं आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल सांगितली महत्त्वाची गोष्ट

काॅमेडी किंग कपिल शर्माचं शुभमंगल येत्या 12 डिसेंबरला आहे. लग्न जालंधरला होणार आहे. गिन्नी त्याची काॅलेजची मैत्रीण. पहिल्यांदाच कपिल शर्मा आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल बोललाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 03:07 PM IST

कपिल शर्मानं आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल सांगितली महत्त्वाची गोष्ट

मुंबई, 27 नोव्हेंबर : काॅमेडी किंग कपिल शर्माचं शुभमंगल येत्या 12 डिसेंबरला आहे. लग्न जालंधरला होणार आहे. गिन्नी त्याची काॅलेजची मैत्रीण. पहिल्यांदाच कपिल शर्मा आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल बोललाय.


कपिल म्हणाला, गिन्नी खूप अध्यात्मिक आहे. ती पूजाअर्चा करते. कपिलसाठी नेहमी देवाजवळ प्रार्थना करते. कपिल-गिन्नी जालंधरच्या काॅलेजमध्ये शिकत होते. पाॅकेटमनीसाठी कपिलनं नाटकाचं दिग्दर्शन सुरू केलं. तिथे गिन्नी आणि त्याची मुलाखत झाली. 2005पासून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.


कपिलने सांगितलं की त्यांचं लग्न दोघांच्या घरच्यांच्या परवानगीनं होत आहे.असं सांगितलं जातं की, लग्नाआधी गिन्नीने कपिलला एक अट घातली आहे, ती म्हणजे त्याने लग्नाआधी दारू पिणं सोडावं, त्यानंतरच लग्न होणार. पण आता या लग्नाच्या चर्चांमुळे कपिलंने दारू सोडली का? असा प्रश्न आहे.

Loading...


गिन्नीच्या आई-वडिलांची इच्छा आहे की त्यांनी लवकरच त्यांच्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी सगळ्यांना सांगावं. म्हणूनच हे दोघेही लग्नाच्या घाईत आहेत.


कपिल आणि गिन्नीनं हंस बलिए या शोमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यात दोघांची केमिस्ट्री खुलून दिसत होती. गिन्नीनं एमबीए केलंय. जालंधरमध्ये ती आपल्या वडिलांचा व्यवसाय पाहते. ती घरातली मोठी मुलगी आहे.


गिन्नी लग्नानंतर मुंबईत कपिलच्या प्राॅडक्शन कंपनीचं काम बघणार आहे. पाच वर्षांपूर्वीच कपिल आणि गिन्नीनं आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे सांगितलं होतं. त्यानंतर कपिलचं नाव अनेक जणींबरोबर जोडलं गेलं. पण दोघांचं प्रेम अबाधित राहिलं. कठीण प्रसंगीही गिन्नी कपिलसोबत ठाम उभी राहिली. आता 12 डिसेंबरला जालंधरमध्ये लग्न आणि 14 डिसेंबरला रिसेप्शन आहे.


दीपवीर, प्रियांका-निकनंतर अजून एका सेलिब्रिटीचं शुभमंगल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...