'फिरंगी'च्या मोशन पोस्टरसह परत आलाय कपिल शर्मा

24 नोव्हेंबरला रिलीज होणारा कपिल शर्माचा बहुचर्चित 'फिरंगी' सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2017 09:26 PM IST

'फिरंगी'च्या मोशन पोस्टरसह परत आलाय कपिल शर्मा

14 आॅक्टोबर : कॉमेडी किंग कपिल शर्मा छोट्या पडद्यावरुन गायब होऊन आता परत मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणारा आहे.  24 नोव्हेंबरला रिलीज होणारा कपिल शर्माचा बहुचर्चित 'फिरंगी' सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

या सिनेमात कपिल शर्मा पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात अगदी उठून दिसतो. या पोस्टरमध्ये ब्रिटनचा झेंडाही पाहायला मिळतो. एवढंच नाही तर या मोशन पोस्टरमध्ये कपिल एका परदेशी व्यक्तीला लाथही मारताना दिसतोय. एकंदरीतच काय तर कपिल आपल्याला सगळ्यांना परत हसवण्यासाठी येणार हे नक्की.

दोन वर्षांआधी अब्बास खानच्या "किस किस से प्यार करुं" या सिनेमातून कपिल शर्माने सिनेमात पदार्पण केलं आणि त्यानंतर तो त्याच्या फिरंगी या सिनेमाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त राहिला. आता अखेर फिरंगीचं पहिलं लुक आपल्या समोर आलं आहे. या पोस्टरला नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा सिनेमा इंग्रजांवर अवलंबुन आहे, ज्यात कपिल पोलिसवाल्याची भूमिका साकारत आहे.

पोस्टरमध्ये पोलीस दलाचं नेतृत्व करणारा कपिल एका परदेशी व्यक्तिला लाथ मारुन हकलवत असताना आपल्याला दिसत आहे.

कपिल शर्माने आपल्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये रिलीज केलेल्या "किस किस से प्यार करुं" या सिनेमानं केली पण तो बॉक्सऑफिसवर जास्त गाजला नाही.

Loading...

समिक्षकांच्या म्हणण्यानुसार कपिलच्या रोमँटिक अवतारला लोकांनी फारशी पसंती दिली नाही. म्हणून त्याने कॉमेडी भूमिका करण्याचा निर्णय घेतला.

या सिनेमात कपिलसोबतच इशिता दत्ता आणि मोनिका गिल या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील, पण या मोशन पोस्टरमध्ये त्यांची झलक आपल्याला पाहायला मिळणार नाही.

कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केल आहे.

आता कपिलची मेहनत किती सफल होते हे त्याची कॉमेडी आणि या सिनेमाचं दिग्दर्शनच हेच ठरवेल, तोपर्यंत कपिलला ऑल दी बेस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...