...म्हणून कपिल शर्माच्या शोवर भडकले नेटकरी; #BoycottKapilSharmaShow ट्रेंड

...म्हणून कपिल शर्माच्या शोवर भडकले नेटकरी; #BoycottKapilSharmaShow ट्रेंड

कपिल शर्मा (kapil Sharma)चा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्या शोविरोधात ट्विटरवर #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर: सुरुवातीच्या काळात तुफान चाललेल्या कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोला आजकाल जणू ग्रहणच लागलं आहे. कधी शोमधील सहकलाकार शो सोडून जातात, तर कधी सेटला आगच लागते. कपिल शर्मासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे. ट्विटरवर चक्क #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

कपिलमुळे बरेचदा हा शो संकटात सापडतो. पण यावेळी लोक कपिलपेक्षा सलमान खान (Salman Khan) वर नाराज आहेत. सलमान या शोचा निर्माता आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येला सलमान खानलाही जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

नेटकऱ्यांचा सलमानवरचा राग अजूनही गेलेला दिसत नाही. सलमान खानवर आरोप आहे की, तो त्याच्या ओळखीच्याच लोकांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देतो. सलमान खानवर नेपोटिझमचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या शोमध्ये वेगवेगळी संकटं येत आहेत. त्याचं मित्राशी झालेलं भांडण, सेटला लागलेली आग, सिनेमामुळे शोकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अशा वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये हा शो अडकलेला आहे.

याआधी काही एपिसोडचाही नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'द कपिल शर्मा शो'चे (The kapil Sharma Show) काही नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

हे वाचा - क्षणभरही विचार न करता दिशा पटानी सलमानला म्हणाली, हो....

आता टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असलेल्या शोला पुढे प्रेक्षकांचा कितपत पाठिंबा मिळणार हे येणारा काळच ठरवेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 5, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या