अखेर कपिल शर्माच्या 'फिरंगी'चं ट्रेलर रिलीज

अखेर कपिल शर्माच्या 'फिरंगी'चं ट्रेलर रिलीज

या ट्रेलरमध्ये कपिलची कॉमेडी आणि मजेशीर झलक दाखवली आहे.

  • Share this:

24 आॅक्टोबर : अखेर कॉमेडी किंग कपिल शर्माच्या 'फिरंगी' सिनेमाच ट्रेलर रिलीज करण्यात आलंय. या ट्रेलरमध्ये कपिलची कॉमेडी आणि मजेशीर झलक दाखवली आहे.

यात कपिल शर्मा घरातील एक उनाड मुलगा आहे पण त्याच्यात एक गोष्ट खास आहे ती त्याची किक. ते असं की, त्याने किक मारली की कंबरेचं दुखणं बरं होतं. त्याच्या याच हुशारीच्या जोरावर त्याला ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी मिळाली.

या नोकरीमुळे त्याच्या प्रेमकहानीत संकट येतं आणि त्यात तो चांगलाच फसतो. सिनेमात त्याच्याच गंमती-जमती दाखवल्या आहेत. आता अभिनय म्हणाला तर कपिल शर्मा परत आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे.

कपिलच्या याच कॉमेडीची त्याच्या चाहत्यांना आतूरता होती. अखेर आता सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढलीय.

कपिलमध्ये एक वेगळाच पंजाबी अंदाज आहे, त्यामुळे या भूमिकेला तो एकदम साजेसा असा आहे. कपिल शर्माचा हा ट्रेलर तसा प्रभावी आणि मजेदार वाटला. पण आता तो बॉक्स ऑफिसवर किती गाजणार हे येता काळच सांगेल.

First published: October 24, 2017, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading