कपील शर्माने अक्षय कुमारला दिलं पैसे मोजण्याचं मशीन; मग अक्कीने काय केलं एकदा पाहाच...

कपील शर्माने अक्षय कुमारला दिलं पैसे मोजण्याचं मशीन; मग अक्कीने काय केलं एकदा पाहाच...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) लक्ष्मी बॉम्बच्या (Laxmi Bomb) प्रमोशनसाठी द कपील शर्मा शो (The Kapil Sharma Show)मध्ये गेला होता. त्यावेळी त्याने कपील शर्माच्या एका कृतीवर भन्नाट उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई,27 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारसोबतच (Akshay Kumar) कियारा अडवाणी (Kiara Advani), तुषार कपूर (Tushar Kapoor), शरद केळकर (Sharad Kelkar) असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्की द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)मध्ये गेला होता.

द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो रीलिज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा शोमधील सदस्य अक्षयला गिफ्ट देत आहेत. असं दाखवण्यात आलं आहे. गंमत म्हणून अक्षयला चक्क पैसे मोजण्याचं मशीन गिफ्ट देण्यात आलं. त्यावर अक्षयने दिलेलं उत्तर जबरदस्त होतं. अक्षय म्हणाला, “हे मशीन कपील शर्माने स्वत:च्या घरातूनच आणलं आहे. इंडस्ट्रीमधले अर्धे पैसे कपीलकडेच जातात.”

लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय. OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर (Hot Star) हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे.

लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटातही अक्षय दिसणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 27, 2020, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading