...म्हणून 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या नावाची नोंद

...म्हणून 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या नावाची नोंद

कपिलचा कॉमेडी शो टॉप 5मध्ये आहे. पण आता कपिलच्या प्रसिद्धीमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आज करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या त्याच्या 'द कपिल शर्मा शो'ची सगळीकडेच चर्चेत आहे. या शो ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कपिलचा कॉमेडी शो टॉप 5मध्ये आहे. पण आता कपिलच्या प्रसिद्धीमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. कपिल शर्माच्या नवाची नोंद आता 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये झाली आहे.

कपिल शर्मा आता भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडियन बनला आहे. कपिलला नुकतंच 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'कडून भारतातील सर्वाधिक पसंती असलेला स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सन्मानित करण्यात आलं. कपिलची पत्नी गिन्नी चथरथच्या एका फॅन पेजवरुन याचं सर्टिफिकेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलं. यानंतर कपिलच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या आधी कपिलला इंडियन ऑफ द इयर आणि बेस्ट अ‍ॅक्टर अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच फोर्ब्स इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्यांमध्ये 2017 पासून त्याचा सामावेश आहे.

कपिल शर्मानं 2013मध्ये कलर्स टीव्ही वरून त्याचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' लाँच केला होता. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कपिलनं 'किस किस को प्यार करूं' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यूही केला होता. या रोमँटिक-कॉमेडी सिनेमाचं दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केलं होतं. कपिलचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर असताना कलाकारांमध्ये झालोल्या अंतर्गत वादांमुळे बंद पडला. पण नंतर काही महिन्यांपूर्वीच कपिलनं नव्या अंदाजात नव्या शो बरोबर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. सध्या त्याचा 'द कपिल शर्मा शो' सोनी टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.

First published: May 17, 2019, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading