कपिल देव यांनी घेतला रणवीर सिंगचा 'क्लास', सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सिनेमाच्या दृष्टीनं कपिल देव यांच्या सारखी स्टाइल आणि हाव-भाव आत्मसात करता यावे यासाठी रणवीर सिंग कपिल देव यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे

  • Share this:

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच '83' या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमासाठी रणवीर प्रचंड मेहनत घेत असून त्यासाठी तो कपिल देव यांच्याकडूनच क्रिकेटमधील बारकावे शिकत आहे.

नुकतेच रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कपिल देव यांच्याबरोबरचे काही कॅन्डिड फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणवीर आणि कपिल देव एकत्र कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या फोटोला रणवीरनं, 'चक्रवात बनत आहे' असं कॅप्शन दिलं आहे.

तर इतर काही फोटोंमध्ये कपिल देव आणि रणवीर सिंग काही चर्चा करताना दिसत आहेत. त्यांची ही भेट कपिल यांच्या घरी झाली असल्याचं हे फोटो पाहिल्यावर समजतं.

रणवीरनं हे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच सगळीकडे व्हायरल होत आहेत. 6 लाखांहून जास्त लोकांनी या फोटोंना लाइक केलं आहे.

'83' हा बायोपिक भारतीय क्रिकेट टीमनं 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे.

या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

सिनेमाच्या दृष्टीनं कपिल देव यांच्या सारखी स्टाइल आणि हाव-भाव आत्मसात करता यावे यासाठी रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 07:15 PM IST

ताज्या बातम्या