मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Actress soujanya suicide : मनोरंजन क्षेत्राला धक्का! अभिनेत्रीने केली आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

Actress soujanya suicide : मनोरंजन क्षेत्राला धक्का! अभिनेत्रीने केली आत्महत्या; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

राहत्या घरात गळफास घेऊन अभिनेत्री सौजन्याने आयुष्याचा शेवट केला आहे.

राहत्या घरात गळफास घेऊन अभिनेत्री सौजन्याने आयुष्याचा शेवट केला आहे.

राहत्या घरात गळफास घेऊन अभिनेत्री सौजन्याने आयुष्याचा शेवट केला आहे.

बंगळुरू, 30 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैय्याच्या आत्महत्येची (Actress suicide) बातमी आली होती. तिचे चाहते अद्यापही या धक्क्यातून सावरले नाहीत, तोच आता आणखी एका कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची बातमी आली (Kannad Actress suicide). कन्नड अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या (Actress soujanya suicide) केली आहे. गळफास घेऊन तिने आयुष्याचा शेवट केला आहे.

सौजन्याने अनेक कन्नड टीव्ही सीरिअलसह काही साऊथ फिल्ममध्येही काम केलं आहे.  बंगळुरूतल्या कुंबलगोडूत ती राहत होती. तिच्या बंगळुरूतील राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे. लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. तिच्या खोलीत सुसाइड नोटही सापडली आहे, ज्यात तिने तिला मानसिक आजार असल्याचंही नमूद केलं आहे. (Actress soujanya in depression).

पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार तिने साडीने गळफास घेतला. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तिच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाही हे नमूद केलं आहे. आपल्या आत्महत्येला आपणच जबाबदार आहोत, असं तिनं सांगितलं.

हे वाचा - Drugs Case: सुशांत सिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीला अटक; Bollywood ड्रग्स प्रकरण

या सुसाईट नोटमध्ये तिने तिचं मानसिक आरोग्य चांगलं नसल्याचंही सांगितलं. ती डिप्रेशनशी लढत होती. त्यातून तिने धक्कादायक पाऊल उचललं. पण यासाठी तिने आपल्या कुटुंबाची विशेषतः आईवडीलांची माफी मागितली आहे. तर वाईट वेळेत साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान याप्रकरणी आता पोलीस तपास सुरू झाला आहे.

हे वाचा - हिंदूंच्या भावना दुखावल्या; आलिया भटविरोधात तक्रार दाखल

सौजन्याच्या आत्महत्येमुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच जयश्री रमैय्यानेही आत्महत्या केली होती. तिनेसुद्धा मानसिक आजारातूनच आयुष्य संपवलं होतं. तसंच 'बिग बॉस कन्नड' फेम अभिनेत्री चैत्र कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

First published:

Tags: Actress, Entertainment, South actress, Suicide