मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Soujanya suicide case ला नवं वळणं; अभिनेत्रीच्या वडिलांनी या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

Soujanya suicide case ला नवं वळणं; अभिनेत्रीच्या वडिलांनी या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्येनंतर (Actress Sounjanya suicide case) तिच्या वडिलांनी दोघांविरोधात तक्रार केली आहे.

अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्येनंतर (Actress Sounjanya suicide case) तिच्या वडिलांनी दोघांविरोधात तक्रार केली आहे.

अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्येनंतर (Actress Sounjanya suicide case) तिच्या वडिलांनी दोघांविरोधात तक्रार केली आहे.

  • Published by:  Priya Lad

बंगळुरू, 01 ऑक्टोबर : कन्नड अभिनेत्री सौजन्याच्या (Kannad actress Soujanya) आत्महत्येची (Kannad actress Soujanya suicide) बातमी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे (actress Soujanya suicide case latest update). अभिनेत्रीच्या वडिलांनी (Actress Soujanya's father allege actor Vivek) आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरवत एका अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

सौजन्या बंगळुरूतील तिच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या खोलीत सुसाईड नोटही सापडली. ज्यात तिने आपल्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं. तसंच आपल्याला मानसिक आजार असल्याचंही तिने सांगितलं. पण आता तिच्या वडिलांनी दोघांविरोधात तक्रार दिली आहे.

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार सौजन्याचे वडील प्रभू मडप्पा यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर दोन जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. यामध्ये  अभिनेता विवेक आणि सहाय्यक महेश याचा समावेश आहे. विवेकवर त्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.

हे वाचा - Bollywood Cat fights: कंगना- दीपिकाच नाही तर या अभिनेत्रींमध्ये आजही आहे खुन्नस

विवेकने आपल्या मुलीला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्रास देत होता, असा आरोप त्यांनी केला आहे. सहाय्यक महेशनने पोलिसांचीही वाट पाहिली नाही आणि माझ्या मुलीचा मृतदेह जिथं तिनं आत्महत्या केली होती तिथून हटवल्याचं त्यांनी सांगितलं. रिपोर्टनुसार मडप्पा म्हणाले, माझी मुलगी ठीक होती. मी नुकतेच तिला पैसे दिले होते. तिचे सोन्याचे दागिने, मोबाईल गायब आहे. एकदा का हे सर्व मिळालं तर सर्वकाही समोर येईल.

हे वाचा - अखेर सैफ अली खानच्या मुलाचीही बॉलिवूडमध्ये एंट्री; इब्राहिम अली खान 'या' भूमिकेत

दरम्यान विवेकला पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. ते आल्यानंतरच आपल्यावरील आरोपांना तो उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. विवेक म्हणाला, मी आता काही बोलणार नाही. सौजन्याला मी एक वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून ओळखतो. जेव्हा तिला समस्या असायची तेव्हा ती मला भेटायची.

First published:

Tags: Entertainment, South actress, Suicide