मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sandalwood Drugs Case: सुप्रीम कोर्टकडून 137 दिवसांनंतर अभिनेत्रीला जामीन मंजूर

Sandalwood Drugs Case: सुप्रीम कोर्टकडून 137 दिवसांनंतर अभिनेत्रीला जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टने सँडलवुड ड्रग्स रॅकेट प्रकरणी कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला गुरुवारी जामिन दिला आहे. तब्बल 137 दिवसांनंतर रागिनी द्विवेदीला जामिन देण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : सुप्रीम कोर्टने सँडलवुड ड्रग्स रॅकेट प्रकरणी कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला गुरुवारी जामीन दिला आहे. तब्बल 137 दिवसांनंतर रागिनी द्विवेदीला जामीन देण्यात आला आहे. ड्रग्ससंबंधी एनडीपीएस कायद्यातील विविध तरतुदींनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे सुनावणी दरम्यान, रागिनी द्विवेदीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा यांनी सांगितलं की, या प्रकरणी अभिनेत्री जेलमध्ये आहे, तर तीन आरोपी जामिनावर बाहेर आहेत. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी द्विवेदीला अटक करण्यात आली होती. परंतु तिच्याकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आले नव्हते.

(वाचा - इंग्रजी येत नाही म्हणुन मुलाखत न देता परत आला होता 'हा' अभिनेता ; आहे सुपरस्टार)

त्यांनी या प्रकरणी अनेक कायद्यांचा हवाला देत, कोर्टाला जामीन देण्याची विनंती केली होती. सरकारी वकिलांच्या बाजूने बोलणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की, हे प्रकरण खासगीरित्या ड्रग्स वापराबाबत नाही, तर द्विवेदीने विविध ठिकाणी रेव पार्टी आयोजित केली आणि त्यात ड्रग्सचा पुरवठा केला. तसंच पुराव्यांसोबतही छेडछाड केल्याचं ते म्हणाले.

(वाचा - आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसले 'विरुष्का'; सोशल मीडियावर PHOTO VIRAL)

न्यायमूर्ती आर एफ नरीमन, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 3 नोव्हेंबर रोजी रागिनी द्विवेदी आणि संजाना गलरानीला जामीन देण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी हायकोर्टने गलरानीला जामीन मिळाला. मात्र रागिनीला जामीन मिळाला नव्हता. अखेर आज 137 दिवसांनी रागिनीला जामीन देण्यात आला आहे.

First published:
top videos