मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कौटुंबीक हिंसाचाराला कंटाळून अभिनेत्रीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबीक हिंसाचाराला कंटाळून अभिनेत्रीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबीक हिंसाचारामुळं वैतागलेल्या चैत्रानं चक्क फिनाईल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्वरित तिला रुग्णालयात भरती केलं गेलं.

कौटुंबीक हिंसाचारामुळं वैतागलेल्या चैत्रानं चक्क फिनाईल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्वरित तिला रुग्णालयात भरती केलं गेलं.

कौटुंबीक हिंसाचारामुळं वैतागलेल्या चैत्रानं चक्क फिनाईल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्वरित तिला रुग्णालयात भरती केलं गेलं.

मुंबई 10 एप्रिल: बिग बॉसमुळं प्रकाशझोतात आलेली दाक्षिणात्य अभिनेत्री चैत्रा कोटूर (Chaitra Kotoor) हिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं कौटुंबीक हिंसाचारामुळं वैतागलेल्या चैत्रानं चक्क फिनाईल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्वरित तिला रुग्णालयात भरती केलं गेलं. त्यामुळं तिचं आयुष्य वाचलं. (Chaitra Kotoor attempts suicide) सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

चैत्रानं काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील नागार्जुना नामक एका व्यवसायिकाशी लग्न केलं. मात्र हे लग्न नागार्जुनाच्या कुटुंबीयांना मान्य नाही. खरं त्यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन मंदीरात लग्न केलं होतं. त्यामुळं कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. शिवाय तिला यामुळं मानसिक त्रासही दिला जात होता. अखेर कुटुंबीयांच्या त्रासाला वैतागून तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

अवश्य पाहा - ‘हे काय घातलंय?...’; उर्वशी रौतेला विचित्र मास्कमुळं होतेय ट्रोल

पोलिसांनी सध्या नागार्जुनाच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत चैत्रानं कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “लग्नानंतर आम्ही नागार्जुनच्या वडिलोपार्जित घरात गेलो होतो. जिथे त्याच्या कुटुंबियांनी आम्हाला घरात येण्याची परवानगी दिली नाही आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जर मी घटस्फोट दिला नाही तर मला जीवे मारलं जाईल अशीही धमकी दिली. गेले अनेक महिने ते आम्हाला त्रास देत आहेत. अखेर या त्रासाला वैतागून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.”

चैत्रानं कन्नडच्या ‘बिग बॉस 7’मध्ये भाग घेतला होता, ज्याचं सूत्रसंचालन किचा सुदीप यानं केलं होतं. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी चैत्रा पटकथा लेखिकही होती आणि ‘हरीप्रिया सुजीदारा’ या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिकाही देखील साकारली होती.

First published:
top videos

    Tags: Crime, Entertainment, Suicide attempt, Suicide case