मुंबई, 22 मे- सध्या जगभरात साऊथ चित्रपटांचा
(South Movies) बोलबाला सुरू आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, कन्नड स्टार
(Kannad Star) किच्चा सुदीपने
(Kiccha Sudeep) हिंदी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर बॉलिवूड आणि साऊथ असा वाद सुरु झाला होता. हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं अभिनेता म्हणाला होता. आता या प्रकरणाबाबत तब्बल महिनाभरानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून, वाद निर्माण करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं त्याने म्हटलं आहे. अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात हिंदीच्या वर्चस्वावरून सोशल मीडियावरही बराच वाद झालेला पाहायला मिळाला होता.
नुकतंच अभिनेत्याने NDTV ला मुलाखत दिली, दरम्यान त्याने या प्रकरणाबद्दलसुद्धा स्पष्टपणे संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने सांगितलं की, ''त्याचा हेतू भांडण किंवा वाद सुरू करण्याचा नव्हता. तो कोणत्याही हेतूशिवाय बोलला होता.' किच्चाने पंतप्रधान मोदींच्या भाषेबद्दलच्या विधानाचे मनापासून स्वागत केलं आहे.किच्चा म्हणाला की, 'जे आपल्या भाषेला महत्त्व आणि आदर देतात. त्यांचं असं बोलणं जबरदस्त आहे. सर्व भाषांचे हार्दिक स्वागत आहे'. अभिनेत्याने सांगितले की तो केवळ कन्नडचे प्रतिनिधित्व करत नाही''.
प्रत्येकाच्या मातृभाषेचा आदर असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत तो बोलत आहे. अभिनेता पीएम मोदींबद्दल म्हणाला की मी त्यांना राजकारणी म्हणून पाहत नाही तर एक नेता म्हणून पाहतो.

सुदीपने असेही सांगितले की 'तो साऊथ सिनेमातून आला आहे आणि त्याला अखिल भारतीय म्हटल्यावर ते आवडत नाही'. या गोष्टीचा हिंदीशी काहीही संबंध नाही. हा आपला देश आहे आणि आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत कारण सिनेमा सर्व भाषांसाठी खुला आहे. प्रत्येक राज्यातील लोकांना चांगले चित्रपट पाहायला आवडतात. आपला मुद्दा पुढे करत अभिनेत्याने सांगितले की, 'याचा कोणत्याही प्रकारच्या भावनांशी काहीही संबंध नाही.पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब केले जातात तेव्हा त्यांना अखिल भारतीय म्हणायला हवं'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.