Home /News /entertainment /

मुलांना भेटण्यासाठी कनिका कपूर व्याकुळ, 4 चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर शेअर केली चिंताजनक पोस्ट

मुलांना भेटण्यासाठी कनिका कपूर व्याकुळ, 4 चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर शेअर केली चिंताजनक पोस्ट

बॉलिवूडची 'बेबी डॉल' गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिने तिच्या फॅन्स आणि कुटुंबीयांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 30 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus)ची जगभरातील अनेक सेलिब्रिटींना लागण  झाली आहे. कनिका कपूर (Kanika Kapoor) ही कोरोना पॉझिटिव्ह असलेली एकमेव भारतीय सेलिब्रेटी. दरम्यान कनिका कपूरने इन्स्टाग्रामवरून तिची व्यथा व्यक्त केली आहे. 'आयुष्य वेळेचा सदुपयोग करायला शिकवते, तर वेळ आयुष्याचं महत्त्व शिकवते', अशा आशयाचा फोटो शेअर करत कनिकाने तिचं दु:ख व्यक्त केले आहे. 'सगळे सुरक्षित राहा. तुम्हाला माझी काळजी वाटते आहे, त्याबद्दल धन्यवाद पण मी सुरक्षित आहे. मी आयसीयूमध्ये नाही आहे आणि ठीक आहे. मी आशा करते की माझी पुढील टेस्ट नेगिटिव्ह येईल. माझ्या मुलांजवळ आणि कुटुंबाजवळ जाण्याची वाट पाहत आहे.' अशी कॅप्शन देत कनिका कपूरने हा फोटो शेअर केला आहे.
  कनिकाची नुकतीच करण्यात आलेली चौथी कोरोना व्हायरस टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. 20 मार्चला कनिका हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. (हे वाचा-कलाकारांकडून मदतीचा ओघ तरी बिग बी शांत का? ट्रोलर्सना बच्चन यांचे 'असे' उत्तर) कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिनं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर 20 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिनं आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या 2 दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणं दिसू लागली असं म्हटलं होतं. मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशमध्ये तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या