मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असलेली एकमेव भारतीय सेलिब्रेटी कनिका कपूरबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. नुकतीच करण्यात आलेली तिची चौथी कोरोना व्हायरस टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. 20 मार्चला कनिका हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती.
कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिनं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर 20 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिनं आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या 2 दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणं दिसू लागली असं म्हटलं होतं. मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशात तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली.
ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण? बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार
दरम्यान कनिकानं अटेंड केलेल्या पार्टीत वसुंधरा राजे आणि त्यांच्या मुलासह अनेक बड्या राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. या जवळपास 262 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 60 लोकांचे मेडिकल रिपोर्ट आले असून हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. याशिवाय कनिका भारतात परतल्यावर तिनं विमानतळावरील तपासणीपासून वाचण्यासाठी बाथरुममध्ये लपून राहिल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे.
‘टी सीरिज’च्या मालकाचं अक्षयच्या पावलावर पाऊल, दान केली मोठी रक्कम
कनिका कपूरचा जन्म भारतात झाला असला तरीही ती इंग्लंड निवासी आहे. कनिका 18 वर्षांची असताना तिचं लग्न एनआरआय बिझनेसमन राज चंडोकशी झालं होतं. या दोघांना 3 मुलं आहेत. मात्र 2012 मध्ये कनिका आणि राजचा घटस्फोट झाला. कनिकानं आतापर्यंत बेबी डॉल, 'चिट्टियां कलाइयां, 'लवली', 'देसी लुक', 'प्रेमिका', 'डा डा डस्से’ ही गाणी गायली आहेत.
‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान