डॉ. आर. के. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिकामध्ये आता कोरोनाची कोणतीही लक्षण दिसत नाही आहे. पूर्वीपेक्षा आता तिच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे. तिची प्रकृती स्थीर आहे. आता ती पूर्वीप्रमाणेच सामान्य व्यक्तीसारखं जेवण घेत आहे. ती खूप आजारी आहे अशा चर्चा सुरू आहेत मात्र या केवळ अफवा आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. चिंतेचं कोणतही कारण नाही. Lockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागतKanika Kapoor (in file pic) is asymptomatic(no symptoms), stable and doing well. She is taking food normally. Information circulated in the media that she is very sick is false: Dr RK Dhiman, Director, Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow pic.twitter.com/7gTb0GyKoH
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2020
कनिका कपूर 9 मार्चला लंडनवरून भारतात परतली होती. त्यानंतर ती तिच्या आई-वडीलांकडे लखनऊला गेली होती आणि त्याच ठिकाणी तिनं एक हाय प्रोफाइल पार्टी अटेंड केली होती. ज्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच तिच्यावर सोशल मीडियावरून खूप टीकाही करण्यात आली. एवढंच नाही तर लोकांचं आरोग्य धोक्यात टाकल्याप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी तिच्यावर FIR सुद्धा दाखल केली आहे. अमृता-RJ अनमोलचा खास लॉकडाऊन VIDEO, लाईव्हदरम्यान केलं चाहत्याच्या मुलीचं बारसं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus