नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : मी 9 तारखेला मुंबईला येतेय, कोणाच्या बापामध्ये अडकवायची हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं वक्तव्य करीत कंगनाने संजय राऊतांना खुलं आव्हान दिलं आहे. उद्या 9 सप्टेंबर असून कंगना मुंबईत येणार असल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर आता कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंगना मुंबईला आल्यानंतर तिला क्वारंटाइन व्हावं लागेल असं पालिकेकडून सांगितलं जात असताना कंगनाच्या कोरोना सॅंपल फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना टेस्ट करण्यासाठी कंगनाचा स्वॅप सँपल फेल झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पुन्हा टेस्ट करण्यासाठी कंगनाची स्वॅब सँपल घ्यावं लागणार आहे. कंगनाची बहिण आणि अन्य एका व्यक्तीची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. यामुळे कंगनाच्या मुंबईला जाण्याच्या प्रवाणात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. मेडिकल कॉलेज नेरचौकच्या एमएस डॉ. जीवानंद चौहान यांनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. चाचणीसाठी कंगनाचं सँपल योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुसऱ्या सँपल घेऊन चाचणी करावी लागणार आहे. आता मंडी जिल्हा स्वास्थ विभागाची टीम कंगनाच्या घरी जाऊन सँपल घेण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाची टीम हा सॅंपल केव्हा घेणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. उद्या 12 वाजता कंगना चंदीगडहून मुंबईला फ्लाइटने रवाना होणार आहे.
हे ही वाचा-"हो मी ड्रग्ज घ्यायचे", अभिनेत्री कंगना रणौतचा VIDEO VIRAL
सुशांत प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांकडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तत्पूर्वी मुंबईत विविध हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.