• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कंगनाचा मोठा आरोप; सुशांतच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी रियासह महेश भट झाले गायब

कंगनाचा मोठा आरोप; सुशांतच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी रियासह महेश भट झाले गायब

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात कंगणाने रिया आणि महेश भट्ट यांच्यावर आणखी एक मोठा आरोप केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जुलै :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी जनआंदोलन सुरू केलं आहे. बॉलिवूडमधील अत्यंत रोखठोक उत्तर देणारी कंगना रणौत या प्रकरणावर वारंवार व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच सुशांतच्या सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कंगना रणौत यावर व्यक्त झाली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून रिया सुशांतबरोबर राहत होती. तिने महेश भट्ट यांना त्याला मानसिक आधार देण्यासाठी बोलवलं. आणि त्याच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी अत्यंत गूढपणे सर्वजण गायब झाले...या सर्व प्रकरणाची चौकशी होणार ही दिलासादायक बाब आहे.. कंगना रणौतच्या या पोस्टवर सुशांतचे अनेक चाहते व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांनी सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीने घर सोडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून विविध मार्गाने तपास सुरू आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागला नसल्याचे सांगितले जात आहे. सुशांतचे चाहते ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं सांगत असून या प्रकरणात सीबीआयची मागणी करीत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: