मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सिने दिग्दर्शक विकास बहलवर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'क्वीन' सिनेमाच्या शूटिंगवेळी विकास बहलने मला जबरदस्ती केल्याचा आरोप कंगनाने केला आहे. त्यामुळे विकास बहल याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
प्रोडक्शन हाऊस 'फँटम फिल्म्स'च्या एका महिला कर्मचाऱ्याने विकास बहल छेडछाड केल्याचा आरोप केल्यानंतर कंगनानेही आता यावर आपला अनुभव सांगत विकास बहलविरोधात तक्रार केली आहे. यात अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंटेना यांच्यावरही तक्रार दाखल करण्यात आली होती.
बहलवर याआधीही छेडछाड केल्याचा आरोप लावला आला होता. गोवा ट्रिपमध्ये बहलने एका महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केलं होतं. याप्रकारानंतर आता कंगनानेही विकास बहल विरोधात आवाज उठवला आहे आणि तिच्यासोबत झालेला प्रकार तिने मीडियासमोर आणला आहे.
तर तक्रारीदरम्यान कंगना म्हणाली की, 'मी त्या महिलेशी सहमत आहे. 2014मध्ये 'क्वीन' सिनेमाच्या शूटिंगवेळी त्याचा विवाह झालेला असतानाही बहल माझ्यासमोर फुशारक्या मारायचा की मी रोज एका नव्या मुलीसोबत लैंगिक संबध ठेवतो. मी कोणाच्याही विवाहित आयुष्याचा विचार करत नाही असं तो म्हणायचा. पण जेव्हा त्याची ही सवय त्याला आजारी पाडायला लागली तेव्हा त्याला त्याचा त्रास व्हायला लागला. '
कंगना पुढे म्हणाली की, 'तो मलाही जेव्हा भेटायचा तेव्हा नेहमी घट्ट मिठी मारून माझ्या केसांचा वास घ्यायचा. तो मला इतका घट्ट पकडायचा की मला त्याला लांब ढकलण्यासाठी खूप जोर लावावा लागायचा. त्याच्या या अशा वागण्याचा मला खूप त्रास व्हायचा. तो मला सारखं म्हणायची की तुझ्या शरीराचा सुगंध खूप छान आहे.'
असं सगळं म्हणत कंगना राणावतने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विकास बहलने माझ्यावरही जबरदस्ती केल्याचा आरोप तिने केला आहे.
VIDEO : आगीतून थोडक्यात बचावले राहुल गांधी