बोल्ड कंगनानं सांगितली तिच्या 'रिलेशनशिप'ची गुपितं

बोल्ड कंगनानं सांगितली तिच्या 'रिलेशनशिप'ची गुपितं

कंगना राणावतने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबत असलेल्या नातेसंबंधांची अनेक गुपितं उघड केली. त्यासोबतच आजवर रिलेशनशीपमध्ये असलेल्या अजून काही स्टार्सबाबतचीही आपली सडेतोड मतं व्यक्त केली.

  • Share this:

विराज मुळे, 08 सप्टेंबर : कंगना राणावतने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबत असलेल्या नातेसंबंधांची अनेक गुपितं उघड केली. त्यासोबतच आजवर रिलेशनशीपमध्ये असलेल्या अजून काही स्टार्सबाबतचीही आपली सडेतोड मतं व्यक्त केली. कंगनाच्या या मुलाखतीवरून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये याबाबत चर्चा सुरू झालीय.

कंगनाने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशनसोबतचे प्रेमसंबंध जगजाहीर करून त्यानंतर घडलेल्या घटनांची मालिकाच उघड केलीय. या मुलाखतीद्वारे तिने हृतिकला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण प्रकरणात हृतिकने कशा प्रकारे आपल्याला नातं टिकवण्यासाठी वारंवार गळ घातली तेही तिने सांगितलं. ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर साहजिकच हृतिक कंगनाच्या नातेसंबंधांचे आजवर मीडियाला फारसे ठाऊक नसलेले अनेक पैलू समोर आलेत. या मुलाखतीनंतर हृतिक ताबडतोब कंगनाला जाब विचारेल किंवा तिला कोर्टात खेचेल असंही वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात भलतंच घडलं.

हृतिकपासून वेगळी झालेली त्याची पत्नी सुझेननं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हृतिकची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार एका चांगल्या माणसाचा गैरफायदा घेण्याचा प्रकार असल्याचं तिने म्हटलंय. तर दुसरीकडे हृतिकनेही या विषयावर प्रसिद्धी माध्यमांसमोर काहीही बोलायला नकार दिला. दुसरीकडे या विषयावर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली.अनेकांनी तर कंगनाची बाजू घेत हृतिकला आता तरी तू कंगनाची माफी मागायला हवीस असा सल्लाही देऊन टाकला.

या मुलाखतीत कंगनाने फक्त हृतिकलाच टार्गेट केलं नाही तर आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्यासोबतच्या नातेसंबंधांबाबतही स्पष्टीकरण दिलं. आदित्यने आपल्याला मुंबईत फ्लॅट घेऊन दिला होता. आपण तिथे रहात होतो मात्र त्याच्या कुटुंबीयांनी आपल्याला अत्यंत हीन वागणूक दिल्याचं तिने म्हटलं. आदित्यने यावर स्पष्टीकरण देताना कंगना ही वेडी झाली असून ती वेड्यासारखं बरळत असल्याचं म्हटलंय. या विषयावर आपण तिला कोर्टात खेचून वठणीवर आणणार असल्याचं जाहीर केलंय.

तर अध्ययनने कंगनासोबतचं नातं संपवताना तिने आपल्यावर काळी जादू करून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यावरही बोलताना कंगनाने तो 98 किलोचा आणि मी 49 किलोची, मी त्याला मारहाण कशी काय करू शकणार असा सवालच उपस्थित केलाय. मात्र अध्ययनने मुलाखत पाहण्याशिवाय आयुष्यात इतर महत्त्वाची कामं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींकडे फारसं लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.

थोडक्यात काय तर कंगनाच्या या तासाभराच्या मुलाखतीने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिलीय. हृतिक, आदित्य, अध्ययन, करण जोहर अशा आपल्या सगळ्या विरोधकांवर तिने यथेच्छ तोंडसुख घेतलं. एरवी आपले संबंध कायम राखत गोलमटोल बोलण्यापेक्षा स्पष्टपणे आपली भूमिका मांडल्याबद्दल कंगनावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होतोय. तर दुसरीकडे सिमरन सिनेमा चर्चेत ठेवण्यासाठी कंगनाने असे बेछूट आरोप केल्याचं हृतिकच्या फॅन्सना वाटतंय. अशात हे आरोप एवढ्यावरच थांबतात की कंगना हृतिकच्या नात्यातील अजून काही बाबी येत्या काही दिवसात उघड होऊन हा वाद अजून चिघळतो ते पहायचं.

First published: September 8, 2017, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading