03 सप्टेंबर : बोल्ड कंगना राणावत कुठेही गेली तरी बातमीच होते. नुकतीच ती सिमरन सिनेमाच्या म्युझिक लाँचला गेली होती. तिथे ती बिनधास्तपणे अनेक विषयांवर बोलली. हृतिक रोशन आपल्याला पाहून कसा पळतो, इथपासून ते ती तिच्या लग्नाविषयीही बोलली.
कंगना राणावतचं लग्न डिसेंबरमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर तिनं उत्तर दिलं. 'माझी बहीण रंगोली अनेकांची लग्न जमवते. मी तिला म्हटलं,माझ्यासाठी मुलगा शोध. ती म्हणाली, ते फार कठीण काम आहे.'
कंगना पुढे म्हणाली, ' आता माझ्याकडे लग्नासाठी वेळ नाही. वेळ मिळेल तेव्हा मी लग्न करेन.'
कंगनाला तू रिलेशनशिपमध्ये आहेस का, असं विचारलं तेव्हा मात्र तिनं यावर काहीच उत्तर दिलं नाही. डाल मे कुछ काला जरुर है.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा