'मणिकर्णिका'साठी कंगना राणावत घेतेय खास ट्रेनिंग, सिनेमात आहे सरप्राईझ

'मणिकर्णिका'साठी कंगना राणावत घेतेय खास ट्रेनिंग, सिनेमात आहे सरप्राईझ

आता मणिकर्णिकाची एक चांगली बातमी समोर आलीय.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : कंगना राणावतचा मणिकर्णिकाची बरीच चर्चा सुरू आहे. कधी त्यात कंगनाचा हटवादीपणा समोर येतो, तर कधी सोनू सूदनं सिनेमा सोडल्याची बातमी येते. पण आता मणिकर्णिकाची एक चांगली बातमी समोर आलीय.

या सिनेमात एक खास गाणं अॅड केलं जाणार आहे. कंगना राणावत म्हणजेच झाशीच्या राणीवर ते गाणं चित्रित केलं जाणार आहे. त्यासाठी सरोज खान टीममध्ये आलीय. कंगना आणि तिचा सिनेमातला नवरा जिशू सेनगुप्तावर हे गाणं शूट केलं जाणार आहे. 18 सप्टेंबरला कर्जतला नितीन चंद्रकांत देसाईंच्या स्टुडिओत ते शूट होईल. कंगना त्याची खास प्रॅक्टिस करतेय.

कंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. कंगनाचा मणिकर्णिका हा झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे. मुख्य भूमिकेत कंगना आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनानं एक गमतीशीर अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ' सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती नसते. मला सीन आणि शाॅट यातला फरकच ठाऊक नव्हता. सुरुवातीला मला सांगायचे, तुझे दोन सीन आहेत.. मला वाटायचं दोन शाॅट आहेत आणि जे अर्ध्या तासात संपून जातील.'

कंगना म्हणाली, ' मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागला. आणि तेव्हा कुठे माझी जागा बनवू शकले. ' इंडस्ट्रीच्या बाहेरून आलेल्या कलाकाराला कशी वागणूक मिळते, या प्रश्नावर कंगना म्हणाली, तुमच्या वाट्याचा संघर्ष करावा लागतोच. तुम्हाला काम द्यायला इथे कुणी बांधील नसतं. तुम्हीही कोणाबरोबर काम करायला बांधील नसता.

सोनू सूदनं मणिकर्णिका सोडला. एका मुलाखतीत सोनूने मणिकर्णिका चित्रपट सोडल्याचं कारण सांगितलं. यावेळी तो म्हणाला की, मणिकर्णिकाचे काही सीन्स परत रिशूट करण्याचा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रिशने घेतला आहे. पण हा चित्रपट घेण्याआधीच मी रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ चित्रपट स्वीकारला होता आणि त्यानुसार दोन्ही चित्रपटांना डेट्स दिल्या होत्या. आता या चित्रपटाच्या रिशूटसाठी माझ्याकडे वेळ नाही.

'या' आहेत श्री रेड्डीच्या ५ कॉन्ट्रोव्हर्सी

First published: September 13, 2018, 9:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading