डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका!

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर अधिक प्रमाणात व्यक्त होत आहे. मात्र तिच्या काही ट्वीट्समुळे ती संकटात सापडली आहे

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) मोठा झटका बसला आहे. तिचं ट्विटर अकाउंट (Twitter Account) तात्पुरतं प्रतिबंधित करण्यात आलं होतं. दरम्यान आज #SuspendKanganaRanaut हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत होता. यानंतर कंगनाने ट्विटरवरून याची माहिती दिली. कंगनाने याबाबत ट्वीट करत तिच्या विरोधकांना अत्यंत कठोर शब्दात इशारा देखील दिला होता. तिने ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत चोख उत्तर दिलं आहे, जे तिचं अकाउंट बॅन व्हावं म्हणून मागणी करत होते.

तिने असं ट्वीट केलं होतं की, 'लिबरल्स रडत त्यांचे काका 'जॅक' यांच्याकडे पोहोचले आणि माझं अकाउंट अस्थायी रुपात प्रतिबंधित केलं. ते मला धमकावत आहेत. माझं अकाउंट/व्हर्च्यूअल आयडेंटिटी देशासाठी कधीही शहीद होऊ शकते. पण माझं रिलोडेड देशभक्त व्हर्जन चित्रपटातून परत येईल. तुमचं आयुष्य दयनीय करून टाकेन'.

कंगनाने आणखी एका ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की, 'देशद्रोही लोकं #SuspendKanganaRanaut हे ट्रेंड करत आहेत, करा. जेव्हा रँग्स (कंगनाची बहिण रंगोली) चं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं तेव्हा मी आले आणि त्यांचं आयुष्य दयनीय करून टाकलं आणि आता त्यांनी माझं अकाउंट सस्पेंड केलं तर मी व्हर्च्यूअल जग सोडेन आणि खऱ्या आयुष्यात दाखवून देईन खरी कंगना रणौत- the mother of all fathers #babbarsherni'

कंगनाच्या या ट्वीटनंतर अनेकांनी तिला पाठिंबा देणारे ट्वीट्स केले आहेत, तर अनेकांनी खरंच तिचं अकाउंट सस्पेंड व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अभिनेत्री कंगना रणौत देशातील प्रत्येक घटनेवर सध्या भाष्य करते आहे. तिने तांडव सीरिजबाबत जो वाद सुरू आहे त्यावरही भाष्य केलं होतं. या सीरिजच्या मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही तिने याबाबत ट्वीट केलं होतं, यातून तिने सीरिजचा दिग्दर्शक अली अब्बास जफरला काही सवाल केले होते.

मात्र तिच्या आणखी एका ट्वीटची सर्वाधिक चर्चा झाली ते म्हणजे तिने तांडवबाबत लिहिताना असं लिहिलं होतं की, 'कारण भगवान श्रीकृष्णाने शिशूपालाच्या 99 चुका माफ केल्या होत्या... आधी शांती मग क्रांती... यांचा शिरच्छेद करण्याची वेळ आली आहे. जय श्री कृष्ण'. कंगनाचं हे ट्वीट अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. हेट स्पीच पसरवणारं, समाजात तेढ निर्माण करणारं, द्वेष निर्माण करणारं हे ट्वीट असल्याचा आरोप कंगनावर केला जात होता. नंतर कंगनाने हे ट्वीट डिलीट केलं होतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 20, 2021, 2:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या