Home /News /entertainment /

मेरे घर आई एक नन्ही परी! कंगनाच्या घरी आहे गोड बातमी

मेरे घर आई एक नन्ही परी! कंगनाच्या घरी आहे गोड बातमी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र सध्या एका गोड बातमीमुळे दोघीही चर्चेत आहेत.

    मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. रंगोली सोशल मीडियावर मुक्तपणे आपली मतं मांडत असते. अनेकदा रंगोली आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेतही येते. सध्या रंगोली एका वेगळ्याच बातमीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. रंगोलीने नुकतच ट्विट करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे. लवकरच ती आपल्या दुसऱ्या बाळाची आई होणार आहे. रंगोलीने ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. रंगोली म्हणाली की, “ मला एक मुलगा आहे. तरीही मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. मी इतरांनाही मुलं दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देईन. सरोगसी करण्याऐवजी दत्तक घेऊन मुलांना त्यांच्या हक्काचं घरं मिळवून द्या.” रंगोली पुढे असे म्हणते की, “ माझ्या बहिणीमुळे मी प्रेरित झाली आहे. अजय आणि मी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केली आहे. काही महिन्यातच आमच्या घरी एक लहान परी येणार आहे. जिचं नाव कंगनाने गंगा असं ठेवलं आहे. मी स्वत:ला नशीबवान समजते की मी एका मुलीला घर मिळवून देऊ शकली.” रंगोलीला याआधी एक मुलगा आहे. ज्याचं नाव पृथ्वी असं आहे. कंगना आणि पृथ्वीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखिल सरोगसीद्वारे आई बनली आहे. तिने तिच्या मुलीचं नाल समीशा असं ठेवलं आहे. तिने समीशाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांनाही ही आनंदाची बातमी दिली होती.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Bollywood, Kangana ranaut, Twitter

    पुढील बातम्या