कंगना रणौतच्या 'जजमेंटल है क्या' सिनेमाने चोरला युरोपियन फोटोग्राफरचा फोटो?, आर्टिस्ट म्हणाली 'किमान विचारा तरी...'

वाद-विवाद आणि कंगना रणौत याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. नुकताच कंगना आणि राजकुमार राव यांचा जजमेंटल है क्या सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीपासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 05:24 PM IST

कंगना रणौतच्या 'जजमेंटल है क्या' सिनेमाने चोरला युरोपियन फोटोग्राफरचा फोटो?, आर्टिस्ट म्हणाली 'किमान विचारा तरी...'

मुंबई, 30 जुलै- वाद-विवाद आणि कंगना रणौत याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. नुकताच कंगना आणि राजकुमार राव यांचा जजमेंटल है क्या सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीपासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सर्व गोष्टींवर मात करत अखेर कंगनाचा सिनेमा प्रदर्शित झाला, पण आता एक नवा वाद समोर आला आहे. एक युरोपियन फोटोग्राफर फ्लोरा बोरसीने जजमेंटल है क्याच्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप केला आहे. फ्लोर बोरसीने दावा केला आहे की, जजमेंटल है क्या सिनेमाच्या मेकर्सने तिच्या परवानगीशिवाय तिच्या एक फोटोग्राफची कॉपी केली आणि त्याचा पोस्टर म्हणून वापर केला. फ्लोरा बोरसीने सोशल मीडियावर तिचे फोटोग्राफ आणि सिनेमाचं पोस्टर शेअर करत दोघांमध्ये किती साम्य आहे हे दाखवून दिलं.

Loading...

फ्लोराने दोन्ही फोटोंचं कोलाज शेअर करत म्हटलं की, 'काही साम्य जाणवतंय का? बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमा जजमेंटल है क्याचं पोस्टर आहे. त्यांनी माझी परवानगी घेतली तर नाहीच शिवाय बोलण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. एका मोठ्या कंपनीच्या फ्रीलान्स आर्टिस्टचं काम चोरणं अत्यंत चुकीचं आहे.' फ्लोरा बोरसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून राजकुमार रावचं एक ट्वीट शेअर करत म्हटलं की, 'हा फोटो मला काही तरी आठवण करून देतोय.. थांबा हे तर अगदी माझ्या फोटोग्राफप्रमाणेच आहे.'

दरम्यान लोकांनी सोशल मीडियावर फोटोग्राफरला पाठिंबा दिला असून जजमेंटल है क्या सिनेमाच्या निर्मात्यांना त्यांनी केलेली चूक मान्य करण्यास सांगितलं आहे. एका युझरने लिहिले की, 'एकता कपूर आणि कंगना रणौत तुम्हा दोघींना विनंती आहे की, तुमच्या टीमच्या कामाची एकदा चौकशी करा. तुमचा नवा सिनेमा जजमेंटल है क्या सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण दुसऱ्या फोटोग्राफरचं काम त्यांच्या परवानगीशिवाय कॉपी करणं निंदनीय आहे.'

अनेकांनी संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीवर चोरी करण्याचा आरोप केला. एका युझरने लिहिले की, 'या महिलेला कोणीतरी सांगा की, संपूर्ण भारतीय सिनेमात प्रत्येक गोष्ट कोणा ना कोणाची कॉपी असते.' तर एका युझरने फोटोग्राफरला जजमेंटल है क्या सिनेमाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं.  सर्व सामान्य जनतेचा मिळणारा पाठिंबा पाहून फ्लोराने सर्वांचे आभार मानत म्हटलं की, 'मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. पण कोणत्याही देशाविरोधात मनात तिरस्कार निर्माण व्हावा असं मला मूळीच वाटत नाही. ही एक मोठी सिनेसृष्टी आहे आणि या कलाकारांमधील गोष्टी आहेत.'

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

Bigg Boss Marathi 2- अतिशहाणपणा नडला, विणा- शिवला मिळणार शिक्षा!

पाकिस्तानी एजंटला विकली भारतीय महिला, सनी देओलने असं आणलं घरी

SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...