मुंबई, 7 जानेवारी : बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत चूक केल्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, जर हे सर्व थांबवलं नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल. प्रत्येक मुद्द्यावर न घाबरता बोलणाऱ्या या अभिनेत्रीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानंतर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
विरल भियानीने आपल्या इन्स्टग्रामवर कंगना रणौतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेलमधील आहे. येथे कंगना पत्रकारांना पोज देताना दिसत आहे. यादरम्यान वेटरने हातात एक ट्रे पकडला आहे. ज्यात केकचे अनेक तुकडे आहेत. कंपना एक तुकडा हातात घेते आणि आपल्या तोंडाजवळ घेऊन जाते. फोटो क्लीक केल्यानंतर ती पुन्हा केक त्याच ट्रेमध्ये ठेवते. कंगनाचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फॅन्स करतायेत ट्रोल...
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. कोरोना महासाथीदरम्यान असं करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, तिने केक उचलला आणि तोंडाजवळ घेऊन गेली, श्वास घेतला आणि तो केक ट्रेमध्ये ठेवला.
हे ही वाचा-लसीचे दोन्ही डोस घेऊनही बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागणपंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्यामुळे कंगना भडकली..
नुकतच कंगनाने पोस्ट लिहून पंजाबचे मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधानांवर हल्ला हा भारतीयांवर हल्ला असल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.