Home /News /entertainment /

'मला सनातन धर्म शिकवू नका...', कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचे खडेबोल

'मला सनातन धर्म शिकवू नका...', कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचे खडेबोल

अनेक नेटकऱ्यांनी धर्माचा दाखला देत तिच्यावर टीकाही केली पण आता कंगनाने त्यांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

   मुंबई 14 ऑगस्ट :  अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी आपल्या शैली मुळे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी धर्माचा दाखला देत तिच्यावर टीकाही केली पण आता कंगनाने त्यांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. फोटोंवरून कंगानाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी बुडापेस्टमध्ये होती. तर आता तिच्या ‘धाकड’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून यानिमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी कंगनाने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट  टॉप परिधान केला होता. त्यानंतर अनेकांनी बोल्ड ड्रेसवरून तिला ट्रोल करयाला सुरूवात केली.
  पण गप्प बसेल ती कंगना कसली, तिनेही ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना खडेबाले सुनावले आहेत. पूरातन काळ तसेच, देव देवींच्या काळातील एक फोटो तिने शेअर केला आहे. तसेच त्यावर कॅप्शनही दिलं आहे.

  8 वर्षांपूर्वीच होणार होतं रिया कपूरच लग्नं; अतिशय फिल्मी आहे सोनमच्या बहिणीची लव्हस्टोरी

  कंगना लिहिते, ‘जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक सारखं वागत आहात.’ असं तिने  म्हंटलं आहे. तर तिच्यावर टीका करणाऱ्यांना तिने अब्राहमिक म्हटलं आहे. दरम्यान  इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देणारी कंगना स्वतः असे कपडे घालते असं म्हणत काही युझर्सनी तिला ट्रोल केलं होतं. त्यानंतर कंगनाने हे सडेतोड उत्तर दिलं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Kangana ranaut

  पुढील बातम्या