मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut : कंगना राणौत आहे विकी कौशलची फॅन!; 'इमर्जन्सी'च्या सेटवर रिक्रिएट केला प्रसिद्ध डायलॉग

Kangana Ranaut : कंगना राणौत आहे विकी कौशलची फॅन!; 'इमर्जन्सी'च्या सेटवर रिक्रिएट केला प्रसिद्ध डायलॉग

kangana ranaut and vicky kaushal

kangana ranaut and vicky kaushal

कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बॉलिवूडच्या कलाकारांवर टीका करायला ती कमी करत नाही. पण यावेळी ती चक्क विकी कौशलची चाहती असल्याचं सिद्ध झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 15 सप्टेंबर : विकी कौशल स्टारर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' रिलीज होऊन जवळपास तीन वर्षे झाली आहेत, पण आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. या चित्रपटातील  'हाऊज  द जोश' हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. आजही प्रेरणा मिळण्यासाठी अनेक जण हा डायलॉग बोलताना दिसतात. आता  चक्क कंगना रानौतने हा डायलॉग बोलत 'उरी' च्या आठवणी जाग्या केल्या आहेत. बुधवारी कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या 'इमर्जन्सी' टीमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बॉलिवूडच्या कलाकारांवर टीका करायला ती कमी करत नाही. पण यावेळी ती चक्क विकी कौशलची चाहती असल्याचं सिद्ध झालं आहे. कंगना  'इमर्जन्सी' चित्रपटाच्या दिल्लीतील सेटवर टीम मेंबर सोबत  विकीचा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहेत. कंगनाने व्हिडिओला कॅप्शन देत म्हंटले आहे कि, 'टीम इमर्जन्सी च्या टीमचा जोश कायम हाय असतो.' दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने तिच्या टीमसोबत एक ग्रुप पिक्चरही शेअर केला आहे.

तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना चांगलाच आश्चर्य वाटलं आहे. एरवी कलाकारांवर सणसणीत टीका करणाऱ्या कंगनाने यावेळी चक्क  कौतुक केलं आहे. पण त्याचबरोबर तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' वर टीका केली आहे. या  चित्रपटाच्या कमाईचे सगळे आकडे खोटे असल्याची टीका तिने चित्रपटाच्या निर्मात्यांवर केली आहे. त्यामुळे वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Kaun Banega Crorepati : केबीसी'च्या सेटवर आले जुळे भाऊ; ओळख पटण्यासाठी बिग बींनी लढवली अनोखी शक्कल; पाहा व्हिडीओ

'इमर्जन्सी' बद्दल बोलायचे झाले तर इंदिरा गांधींवर आधारित हा चित्रपट कंगना राणौत दिग्दर्शित करत आहे.  यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्याच  भूमिकेत दिसणार आहे. ती दुसऱ्यांदा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटात तिच्याबरोबर अनुपमी खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरी हे कलाकारही मुख्य भूमिका साकारणार आहेत.

कंगनाची वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर ती  याआधी 'धाकड'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण तिला 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Kangana ranaut