Home /News /entertainment /

कंगनाची बडबड सुरूच, शिवसेनेला पुन्हा डिवचले

कंगनाची बडबड सुरूच, शिवसेनेला पुन्हा डिवचले

'त्यांना वाटलं मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे'

    मुंबई, 14 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत वाद चांगलाच पेटला होता. अखेर शिवसेनेनं कंगना प्रकरण हे आमच्यासाठी संपले आहे, असं जाहीर करावं लागलं. पण दुसरीकडे कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच आहे. शिवसेनेनं आपल्या मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून कंगना राणावतवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून सल्लावजा टोला लगावला होता. राऊतांच्या या टीकेला आज कंगना राणावतने ट्वीट करून पलटवार केला आहे. जेव्हा रक्षकच हे भक्षक झाल्याचे दाखवत आहे, त्यामुळे तेच लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमजोर समजून त्यांनी मोठी चूक केली आहे, असा पलटवार कंगनाने सेनेवर केला आहे. तसंच, त्यांना वाटलं मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टीकाही कंगनाने केली. दरम्यान, रविवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता शिवसेना या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हा विषय आमच्यासाठी बंद झाल्याचंही स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, कंगना रणौत प्रकरणावर आम्ही आता बोलणार नाही. मात्र, या प्रकरणावर सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर आमचं बारीक लक्ष आहे. कोण काय करतं याची आम्ही नोंद ठेवतो आहोत. या मागे कुठला पक्ष आहे, व्यक्ती आहे, त्यांचा उद्देश काय आहे याची आम्हाला माहिती आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या