मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रोहित शर्माबाबत अपशब्द वापरत कंगनाने केलेल्या ट्वीटवर ट्वीटरची कारवाई, कंगनाचा संताप अनावर ट्वीटरला दिली धमकी

रोहित शर्माबाबत अपशब्द वापरत कंगनाने केलेल्या ट्वीटवर ट्वीटरची कारवाई, कंगनाचा संताप अनावर ट्वीटरला दिली धमकी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलनाच्या (farmer protest) पार्श्वभूमीवर रोहित शर्मावर (Rohit sharma) निशाणा साधला आहे. तिने एक ट्वीट करत रोहित शर्मा विषयी अपशब्द (Abusive words) वापरले आहेत. कंगना राणौतचे हे ट्वीट आता हटवण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 05 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. तिने एक ट्वीट करत रोहित शर्मा विषयी अपशब्द वापरले आहेत. कंगना राणौतचे हे ट्वीट आता हटवण्यात आलं आहे. कंगना राणौतने ट्वीटरने केलेल्या या कारवाईवर देखील आक्षेप घेवून ट्वीटरला धमकी दिली. कंगनाने आपली नाराजी व्यक्त करताना 'ट्वीटर' प्लॅटफॉर्मला 'चीनची कठपुतली' असं संबोधलं आहे.

खंरतर रोहित शर्माने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, 'शेतकरी हा आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरत काही ना काही समाधान निघेल.' या ट्वीटवर कंगाना नाराज झाली असून तिने या ट्वीटला क्वोट करत रोहित शर्मावरच हमला केला आहे. कंगनाने रोहित शर्माविषयी केलेल्या ट्वीटला ट्वीटर इंडियाने कारवाई करत हटवलं आहे.

कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये काय लिहिलं?

कंगना राणौतने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'सर्व क्रिकेट खेळाडूंची अवस्था 'धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का' झाल्याप्रमाणे का वाटत आहे. शेतकरी अशा कायद्यांच्या विरोधात का असतील, जे कायदे त्यांच्या भल्यासाठी आहेत. शेतकरी आंदोलनाच्या आड आतंकवादी राडा घालत आहेत, असं म्हणयाला इतकी भीती कशाची आहे.' हे संबंधित ट्वीट आता हटवण्यात आलं आहे. यावर आता कंगनाने आणखी एक ट्वीट करत ट्वीटर इंडिया विरोधात आगपाखड केला आहे.

या ट्वीटमध्ये कंगनाने लिहिलं की, 'चीनची कठपुतली असलेल्या ट्वीटरने माझं अकाऊंट सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. मी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नसताना, ट्वीटरने माझ्या विरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मी ज्यादिवशी ट्वीटरवरून जाईल, त्यावेळी मी तुमच्या सर्वांना सोबत घेवून जाईल. जसं टिकटॉकवर बॅन करण्यात आलं आहे, तसं तुमच्यावरही बंदी घालण्यात येईल. '

First published:

Tags: Bollywood actress, Kangana ranaut, Rohit sharma