'सोनिया सेने'विरोधात कमेंट करताना कंगनाकडून झाली मोठी चूक! Facebook चे आभार मानल्याने होतेय ट्रोल

Facebook ने म्हणे सोनिया सेनेच्या गुंडांपासून सुरक्षित असल्याचं नोंदवायला mark yourself safe फीचर आणलंय. या बातमीमागचा उपहास कंगनाला कळला नाही की... आणखी काही? काय आहे नेमकं प्रकरण?

Facebook ने म्हणे सोनिया सेनेच्या गुंडांपासून सुरक्षित असल्याचं नोंदवायला mark yourself safe फीचर आणलंय. या बातमीमागचा उपहास कंगनाला कळला नाही की... आणखी काही? काय आहे नेमकं प्रकरण?

  • Share this:
    मुंबई, 14 सप्टेंबर : कंगना रणौतचं शिवसेनेशी Twitter युद्ध अजूनही सुरूच आहे. आज आदित्य ठाकरे यांचं थेट नाव घेत कंगनाने सोशल मीडियावरून शिवसेनेवर हल्ला केला. पण नंतर मात्र सोनिया सेनेच्या गुंडांपासून स्वतःचा बचाव करण्याबद्दल असलेल्या एका उपहासात्मक पोस्टचा अर्थच लक्षात न घेता कंगनाने त्यावर कमेंट करत Facebook चे आभार मानले. त्यावरून कंगना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे. कंगनाच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी मात्र कंगनाने मुद्दामच हे ट्वीट केलं. कंगनाच्या ट्वीटमध्येही उपहास दडला आहे, असं सांगत बाजू लावून धरली आहे. नेमकं काय प्रकरण आहे हे? फेसबुकने सोनिया सेनेच्या गुंडांपासून आपण सुरक्षित असल्याचं मार्क करा - असं नवं फीचर आणल्याची बातमी प्रसिद्ध झाली. (Facebook Launches “Mark Yourself Safe From Shivsena Goons” Feature) फेसबुक नेहमीच संकटकाळात हे फीचर लाँच करत. उदाहरणार्थ निसर्ग चक्रीवादळात मी सुरक्षित आहे, असं लिहिण्याची सोय फेसबुकने ठेवली होती. म्हणजे आपल्या आप्तजनांना तुम्ही सेफ असल्याचा संदेश फेसबुकच्या या फीचरच्या माध्यमातून मिळत असतो. आता झालं असं की, thefauxy.com या उपहासात्मक लिखाण आणि विडंबन करणाऱ्या वेबसाईटने मुद्दामच सोनिया सेनेच्या गुंडांपासून सेफ असल्याचं फीचर फेसबुकने दिल्याची बातमी दिली. त्यावर कंगनाने ट्वीट करत फेसबुकला चक्क धन्यवाद दिले आहेत. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण झालंच पाहिजे. सोनिया सेनेच्या गुंडांपासून लोकांना Covid-19 विषाणूसारखंच संरक्षण हवं आहे.  या फीचरचा समावेश केल्याबद्दल आभारी आहे. असं म्हणत टाळ्यांचा इमोजी कंगनाने शेअर केला आहे. सोनिया सेनेच्या गुंडांचा निषेध करण्यासाठी कंगनाने हे ट्वीट केलं खरं, पण तिला उपहास समजलाच नाही, म्हणत कंगनावर नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. कंगनाने जाणूनबुजून हे tweet केलं की अनवधानाने तिला ही खरीच बातमी वाटली आणि तिने लगेच फेसबुकचे आभार मानले हे खरं तर सांगता येणार नाही. पण कंगनाच्या Tweet मध्ये उपहासात्मक प्रतिक्रिया दिसत नाही. त्यामुळे सहाजिकच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रणौत सोमवारी मुंबईहून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. तिने आदित्य ठाकरेंचं नाव घेत आरोप करणारं ट्वीट दोन तासांपूर्वीच शेअर केलं होतं. त्यानंतर तिचं हे फेसबुकचे आभार मानणारं Tweet आलं.  सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, असं कंगनाने म्हटलं होतं. त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाचं म्हणणं आहे. दरम्यान, कंगना प्रकरण हे आता आमच्यासाठी बंद झाल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातल्या सर्व घडामोडींवर आमचं लक्ष असल्याचं सूचक वक्तव्य रविवारीच खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: