'रणबीर-रणवीरने ड्रग टेस्ट करावी', हे कलाकार अॅडिक्ट असल्याचा कंगनाचा आरोप
अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवूडमधील अनेकांवर सध्या निशाणार साधत आहे. करण जोहर, आदित्य चोप्रा, अनुभव सिन्हा यांच्यावर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा तिने तिचा मोर्चा बीटाऊनच्या नवीन पिढीकडे वळवला आहे.
मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील अनेकांवर सध्या निशाणार साधत आहे. करण जोहर, आदित्य चोप्रा, अनुभव सिन्हा यांच्यावर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा तिने तिचा मोर्चा बीटाऊनच्या नवीन पिढीकडे वळवला आहे. तिने बॉलिवूडमधील ड्रग्न संदर्भात भाष्य केले आहे. या ट्वीटमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टॅग केले आहे. कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्या, असे चर्चेत आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखाेंची प्रेरणा ठरतील.'
I request Ranveer Singh, Ranbir Kapoor, Ayan Mukerji, Vicky Kaushik to give their blood samples for drug test, there are rumours that they are cocaine addicts, I want them to bust these rumours, these young men can inspire millions if they present clean samples @PMOIndia 🙏 https://t.co/L9A7AeVqFr
कंगनाच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. दरम्यान याआधी तिने ड्रग्ज संदर्भात केलेल्या आणखी एका ट्वीटमधू दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर देखील कठोर शब्दात टीका केली होती.
Hey I specifically mentioned most high profile parties and inner circle of hugely successful stars, I have no doubt that people like you have never been invited to those parties cos these drugs are expensive, 99% superstars have been exposed to hard drugs and I guarantee this.
दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगना रणौतने मदत करू इच्छित असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सांगितले होते. तिने असे म्हटले होते की इंडस्ट्रमध्ये येणारे ड्रग आणि त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असल्याचा दावा तिने केला होता. त्यामुळे ती मदत करू इच्छित असल्याचे कंगनाने म्हटले होते.
कंगनाने करण जोहरला देखील सोशल मीडियावर लक्ष्य केले आहे. तिने एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे आणि करण जोहर विरोधात योग्य कारवाईची मागणी केली आहे.