मुंबई, 19 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे तिला पंगा क्वीनदेखील म्हटलं जातं. सध्या कंगना रणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. चित्रपटाचं एक शेड्यूल पूर्ण झालं आहे. कंगना आता आपल्या चित्रपटाच्या पुढील शेड्यूलची तयारी करत आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर यासंबंधीचे अपडेट शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने लिहलंय, "इमर्जन्सीचं पुढील शेड्यूल सुरु करण्यासाठी प्री प्रॉडक्शन." फोटोमध्ये कंगना रणौत तिच्या टीमसोबत बसलेली दिसून येत आहे. कंगनाच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली हा सिनेमा बनवला जात आहे. विशेष म्हणजे कंगना स्वतः या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.
सोबतच कंगना राणौतने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने आपल्या या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर करत, तिच्या पोशाखावरून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना रणौत नेहमीच्या आपल्या हटके अंदाजात उत्तर देत फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, "मी फक्त या गोष्टीवर जोर देत आहे की. महिला काय परिधान करतात किंवा काय परिधान करणं विसरतात ही पूर्णपणे त्यांची निवड आहे...यामध्ये तुमचा काहीच संबंध नाही'.
कंगना रणौत एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असते. ती विविध विषयांवर निडरपणे आपली बाजू मांडत असते. हा फोटो पोस्ट करत या कॅप्शनमध्ये कंगना राणौतने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. तसेच आणखी एक फोटो शेअर करत कंगनाने मजेशीर अंदाजात लिहलंय, “मला वाटतं मी माझं म्हणणं मांडलंय… मी आता ऑफिसला जाऊ का? बाय." कंगनाचा हा फोटो विरल भयानीनेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगना ब्रालेट आऊटफिट्समध्ये दिसून येत आहे.
कंगना राणौतच्या या फोटोवर नेटकरी जोरदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहलंय की, "जर दुसरं कोणीतरी हे परिधान केलं असतं तर दीदींना हिंदू धर्म, संस्कृती आणि काय काय आठवलं असतं." दुसर्या युजरने लिहलंय की, "ही तीच आहे जिने उर्मिता मातोंडकरला पॉर्नस्टार म्हटलं होतं." आणखी एकाने लिहलंय, "ही तीच आहे जी रिहानाला आमच्या संस्कृतीचे धडे देत होती." अशाप्रकारे कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kangana ranaut