मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘भारतात येताच बदलले रंग?’ सलवार सूटमुळे कंगना रणौत पुन्हा एकदा ट्रोल

‘भारतात येताच बदलले रंग?’ सलवार सूटमुळे कंगना रणौत पुन्हा एकदा ट्रोल

अलिकडेच कंगना कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्यासाठी विदेशात गेली होती. तिथे तिने बिकिनी परिधान करून फोटोशूट केलं होतं.

अलिकडेच कंगना कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्यासाठी विदेशात गेली होती. तिथे तिने बिकिनी परिधान करून फोटोशूट केलं होतं.

अलिकडेच कंगना कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्यासाठी विदेशात गेली होती. तिथे तिने बिकिनी परिधान करून फोटोशूट केलं होतं.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 18 ऑगस्ट: कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. (Kangana Ranaut trolled) असाच काहीसा प्रकार यावेळीसही घडला आहे. इतर अभिनेत्रींच्या कपड्यावर कमेंट करणारी कंगना यावेळी स्वत:च आपल्या कपड्यांमुळे ट्रोल होत आहे. विदेशात बिकिनी अन् भारतात सलवार सूट... ड्रामेबाज कंगना असं म्हणत तिची खिल्ली उडवली जात आहे.
प्रसिद्ध TV अभिनेत्री 41व्या वर्षी होणार आई; मॅटर्निटी Photo Shoot होतंय Viral नेमकं प्रकरण काय आहे? अलिकडेच कंगना कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्यासाठी विदेशात गेली होती. तिथे तिने बिकिनी परिधान करून फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोंवर प्रचंड टीका करण्यात आली. “इतरांना भारतीय संस्कृती आणि सनातनचं ज्ञान देतेस आणि स्वत: असे कपडे परिधान करतेस” असं म्हणत तिची खिल्ली उडवण्यात आली. कारण काही दिवसांपूर्वी तिने देखील बॉलिवूड अभिनेत्रींच्या बोल्ड कपड्यांवर टीका केली होती. लक्षवेधी बाब म्हणजे भारतात परतताच कंगना सलवार सूटमध्ये वावरू लागली. परंतु यामुळे देखील तिला आता ट्रोल केलं जात आहे. “आता पूर्ण कपडे घालून ही बॉलिवूडला संस्कारांचं भाषण देणार” तर दुसरा युजर म्हणाला, “भारतात परतताच सलवार सूट खूप ड्रामेबाज आहे ही” तर आणखी एका नेटकऱ्याने कंमेटं करत म्हंटलं, “ज्ञान देणारी देवी तुझं मास्क कुठे आहे?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी कंगनाची जोरदार खिल्ली उडवली आहे. दरम्यान या ट्रोलिंगवर अद्याप तिने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
First published:

Tags: Bollywood actress, Kangana ranaut, Social media troll

पुढील बातम्या