‘ताई तुमच्याकडे खरंच मेंदू आहे का?’ ईदच्या शुभेच्छा देणारी कंगना इन्स्टावरही होतेय ट्रोल

‘ताई तुमच्याकडे खरंच मेंदू आहे का?’ ईदच्या शुभेच्छा देणारी कंगना इन्स्टावरही होतेय ट्रोल

देशातील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. (Kangana Ranaut celebrates Eid) मात्र शुभेच्छा देताना ती असं काही म्हणाली ज्यामुळं पुन्हा एकदा नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

  • Share this:

मुंबई 15 मे: कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अगदी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, देशातील राजकारण ते आंतराष्ट्रीय युद्ध अशा जगभरात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ती आपली रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील करण्यात येतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. कंगनानं नुकतंच देशातील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. (Kangana Ranaut celebrates Eid) मात्र शुभेच्छा देताना ती असं काही म्हणाली ज्यामुळं पुन्हा एकदा नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. (Kangana Ranaut Viral Video)

“कट्टर इस्लामी दहशतवादाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात भारताने इस्रायलची साथ दिली आहे. आपल्या देशाला आणि नागरिकांना दहशतवादापासून वाचवणे हे प्रत्येक राष्ट्राचा मूलभूत अधिकार आहे. या प्रकरणात भारताने इस्रायलची साथ दिली आहे.” असं म्हणत तिनं ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र हा व्हिडीओ उलट तिच्याच अंगाशी आला आहे. अनेक जण तिच्यावर संतापले आहेत. “दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं काम नाही का? कधीतरी डोकं ठिकाणावर ठेवून बोलत जा? 'ताई, तू सगळं पोस्ट करते आणि निघून जातेस आणि इथे भक्तांना ट्रोल केले जातं.” अशा आशयाच्या कॉमेट्स करुन संतापलेले नेटकरी सध्या तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

निधी अग्रवालचा ‘मुन्ना’ हरवलाय; शोधून देणाऱ्याला मिळणार 1 लाखांचं बक्षिस

काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह ट्विट्स केल्यामुळं कंगनाचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यामुळं सध्या ती आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करतेय. मात्र या प्लॅटफॉर्मवर देखील तिची एक पोस्ट डिलिट करण्यात आली होती. या प्लॅटफॉर्मवर देखील ती सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तिला इथून देखील काढलं जाईल अशी शंका तिचे विरोधक व्यक्त करत आहेत.

Published by: Mandar Gurav
First published: May 15, 2021, 12:27 PM IST

ताज्या बातम्या