मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut: कंगनाच्या साडीपेक्षा हॅन्डबॅगचीच किंमत जास्त; पोस्टमुळे अभिनेत्री स्वतःच ट्रोल

Kangana Ranaut: कंगनाच्या साडीपेक्षा हॅन्डबॅगचीच किंमत जास्त; पोस्टमुळे अभिनेत्री स्वतःच ट्रोल

कंगना रणौत

कंगना रणौत

कंगना सध्या तिच्या फॅशन सेन्ससाठी जबरदस्त चर्चेत आहे. तिचा साडी लुक नेहमीच चर्चेत असतो. आज अभिनेत्री आपल्या साडी आणि हॅन्डबॅगच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 ऑक्टोबर-   बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाचे चित्रपट बऱ्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे तिच्या 'इमर्जन्सी'ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान, कंगना तिच्या फॅशन सेन्ससाठी जबरदस्त चर्चेत आहे. तिचा साडी लुक नेहमीच चर्चेत असतो. आज अभिनेत्री आपल्या साडी आणि हॅन्डबॅगमुळे चर्चेत आली आहे.

नुकतंच कंगना रणौत एयरपोर्टवर दिसून आली.याठिकाणी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सार्वजनिक ठिकाणी साडी किंवा इतर पारंपरिक पोशाखात दिसून येते. एअरपोर्टवरसुद्धा अभिनेत्री सहसा पारंपरिक लुकमध्ये दिसून येते. दरम्यान कंगना पुन्हा एकदा देसी लुकमध्ये दिसून आली. यादरम्यान तिने अगदी साधी कॉटनची साडी नेसली होती. या साडीच्या किंमतीची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. तत्पूर्वी कंगनाने स्वतः या साडीची किंमत उघड करत सर्वानाच चकित केलं आहे.

(हे वाचा:Kareena-Saif Wedding Pic: वडिलांच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होती सारा;सावत्र आई करीनासोबतचा फोटो VIRAL )

कंगना रणौतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा तोच एयरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ती फिकट निळ्या रंगाच्या कॉटनच्या साडीत दिसत आहे.या व्हिडीओमध्ये कंगनाने आपले केस खुले ठेवले आहेत. व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहलंय की, आपण नसलेल्या साडीची किंमत फक्त 600 रुपये आहे. आणि ही सुंदर साडी आपण कोलकत्तामधून खरेदी केली होती. महत्वाची बाब म्हणजे कंगनाच्या साडीपेक्षा तिची हॅन्डबॅगच प्रचंड महागडी आहे. अभिनेत्रीने घेतलेली बॅग लेडी डायर ब्रँडची आहे. भारतात या बॅगेची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये इतकी आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कंगनाने 'वोकल फॉर लोकल' होण्याचं आवाहन केलं आहे. कंगनने लिहलंय, 'मी ही साडी कोलकत्ता येथून 600 रुपयांना विकत घेतली आहे. फॅशन ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडची गुलाम नसल्याचही कंगनाने म्हटलं आहे. अति राष्ट्रवादी व्हा आणि स्वतःचा प्रचार करा. तुमची प्रत्येक कृती ही देशाच्या हितासाठी असावी. तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिल्यास, अनेक कुटुंबांना मदत होईल. वोकल फॉर लोकल', जय हिंद.असं म्हणत कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कंगनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कंगनाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी या साडीसोबत तिच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या बॅगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कंगना नुकतंच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना भेटण्यासाठी पोहोचली होती. या भेटीदरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Kangana ranaut