बॉलिवूडचा सर्वात मोठा वाद मिटला? करण जोहरच्या सेल्फीमध्ये दिसली कंगना रनौत

मोदींच्या शपथविधी समारंभानंतर करण जोहर आणि कंगना रनौत यांचा तो सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 05:27 PM IST

बॉलिवूडचा सर्वात मोठा वाद मिटला? करण जोहरच्या सेल्फीमध्ये दिसली कंगना रनौत

मुंबई, 31 मे : 30 मेच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी राजकीय, व्यावसायिक, कला आणि अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती. मात्र यात बॉलिवूड कलाकारांची शपथविधी समारंभातील उपस्थिती विशेष चर्चेत राहीली.

काल (30 मे)संध्याकाळी पार पडलेल्या या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, राकेश ओम, प्रकाश मेहरा, राजकुमार हिरानी, कपिल शर्मा, मीरा कपूर, कंगना रनौत, अनुपम खेर, आशा भोसले आदी कलाकार उपस्थित होते. पण या सर्वानंतर सध्या कंगना रनौतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण या फोटोमध्ये कंगना आणि करण जोहर एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. करण जोहरनं काढलेला हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये निर्माता करण जोहर सेल्फी घेताना दिसत आहे. त्याच्या मागे राकेश ओम आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत कंगना सुद्धा दिसत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील स्टार किड्स आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून करण आणि कंगनामध्ये प्रचंड वाद झाले आहे. असं असताना कंगना आणि करण एकाच सेल्फीमध्ये दिसल्यानं आता मोदींच्या शपथविधी समारंभामध्ये त्यांच्यातील वाद संपला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.


Loading...

करण व्यतिरिक्त कंगना शशि थरूर यांच्या सोबत सेल्फी घेतना दिसत आहे. खरं तर कंगनानं या समारंभाला हजेरी लावणं कोणासाठीच नवं नव्हतं कारण कंगना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिसली होती. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळाल्यानंतर घरातील सर्वांना चहा आणि भजी खाऊ घालत कंगनानं तिचा आनंद व्यक्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...