मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कंगना म्हणते मीच मधुबाला यांची कॉपी, पटत नसेल तर तिची पोस्ट पाहा

कंगना म्हणते मीच मधुबाला यांची कॉपी, पटत नसेल तर तिची पोस्ट पाहा

कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही सुरूवातीच्या दिवसातील फोटो शेअर केले आहेत. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तारूण्यात मी हुबेहूब मधुबाला यांच्यासारखी दिसत होते.

कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही सुरूवातीच्या दिवसातील फोटो शेअर केले आहेत. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तारूण्यात मी हुबेहूब मधुबाला यांच्यासारखी दिसत होते.

कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही सुरूवातीच्या दिवसातील फोटो शेअर केले आहेत. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तारूण्यात मी हुबेहूब मधुबाला यांच्यासारखी दिसत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 फेब्रुवारी- कंगना राणौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. कंगना नेहमी तिच्या कोणत्या कोणत्या वक्तव्यामुळं चर्चेत असते. विषय कोणाताही असो ती आपलं मत मांडत असते. यामुळं ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते. यासोबतच कंगना सोशल मीडियावर तिचे काही फोटो देखील शेअर करत असते. गुरूवारी कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही सुरूवातीच्या दिवसातील फोटो शेअर केले आहेत. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, तारूण्यात मी हुबेहूब मधुबाला यांच्यासारखी दिसत होते.

कंगनाने मधुबाला यांच्यासोबत फोटोंच एक कोलाज शेअर केलं आहे

कंगनाने मधुबाला यांच्यासोबत एक फोटोंच कोलाज शेअर केलं आहे. लोकांना देखील वाटतं की, पडद्यावर मी मधुबाला यांची भूमिका साकारावी. जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी मधुबाला यांची कॉपी दिसत होते. आता मात्र यावर मी ठाम नाही, असं देखील ती म्हणते. यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील तिच्या सुरूवातीच्या दिवसातील काही फोटो शेअर केले आहे. एक फोटो शेअर करत कंगानाने म्हटलं आहे की, अरे देवा....बॉलिवूडमध्ये हे माझं पहिलं वर्ष होतं.

बॉलीवूमधील लेडी सुपरस्टार होत्या मधुबाला

मधुबाला या 1940, 50 आणि 1960 च्या दशकातील सर्वात मोठी सुपरस्टार होत्या. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा ‘मुग़ल-ए-आज़म’ हा सिनेमा साठच्या दशकातील सर्वात मोठा सिनेमा होता. मधुबाला यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. कंगना आज त्यांच्याशीच स्वतःची तुलना करत आहेत्यांचे काही लोकप्रिय चित्रपट-‘नील कमल’ (1947),’ अमर’ (1954), ‘महल’ (1949), ‘बादल’ (1951), ‘तराना’ (1951), ‘मिस्टर एंड मिसेज 55’ (1955), ‘चलती का नाम गाड़ी’ (1958) ‘हाफ टिकट’ (1962), ‘हावड़ा ब्रिज’ आणि ‘काला पानी’ (1958) आणि बरसात की रात (1960) ) या चित्रपटांच समावेश आहे.

कंगनाने 2006 मध्ये केला होता डेब्यू

कंगनाने 2006 मध्ये बॉलिवू़डमध्ये गॅंगस्टर सिनेमातून पहिलं पाऊल ठेवलं होतं. कंगना शेवटची ‘धाकड़’ या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. सध्या ती तमिळच्या ‘चंद्रमुखी 2’ या सिनेमाच्या शुटींगध्ये व्यस्थ आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut