कंगना रणौत होणार भाजपची स्टार प्रचारक? अखेर फडणवीसांनी दिलं उत्तर...

कंगना रणौत होणार भाजपची स्टार प्रचारक? अखेर फडणवीसांनी दिलं उत्तर...

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करीत आहे.

  • Share this:

गया, 14 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत व शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. कंगना रणौतने मुंबईची तुलना  पीओकेशी केल्यानंतर शिवसेना नेता संजय राऊत यांनी कंगनावर तोड डागली. त्यानंतरही मुंबईत नाट्य सुरूच होता. त्यादरम्यान कंगना रणौत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अभिनेत्री कंगना रणौत येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांपैकी एक असेल ही शक्यता फेटाळली आहे. बोधगया येथे पत्रकारांशी बातचीत करताना एका प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजपजवळ स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते फार मोठे स्टार प्रचारक आहे. नरेंद्र मोदी असताना दुसऱ्या स्टार प्रचारकाची गरज नाही.

बिहार राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीत (राजग) भाजपाच्या छोट्या भावाच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की कोणीही लहान-मोठा भाऊ नाही. सर्वजण एक-दुसऱ्यांचे सहकारी आहेत. जदयू, भाजपा आणि लोजपा एकमेकांना साथ देत बिहारमध्ये राजगची बहुमताचं सरकार तयार करतील.

हे ही वाचा-संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक, मोदी सरकारला विचारला जाब

यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी कंगनाशी लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोरोनाविरोधात लढाई करावी. यावेळी बिहारचे कृषी मंत्री प्रेम कुमार यांच्यासह भाजपचे अन्य नेताही सहभागी झाले होते.

हे ही वाचा-शशी थरूर यांनी लिहिलं अस्सं इंग्रजी; डिक्शनरीशिवाय कळणं अवघड

मुंबईत ५ दिवसांच्या दौऱ्यानंतर कंगना रणौत सोमवारी सकाळी मनालीला परतली आहे. तिने आपल्या ट्विटरवर एक संदेश पोस्ट केला आहे. तिने लिहिलं आहे की- जड अंतकरणाने मी मुंबईतून जात आहे..या दिवसात सातत्याने माझ्यावर हल्ला केला जात होता..मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझं कार्यालय तोडण्यात आलं...माझ्या सोबत कायम इतके सुरक्षारक्षक होते त्यामुळे पीओकेसह मुंबईती मी केलेली तुलना धमाकेदार होती.  अभिनेत्री कंगनाने दावा केला आहे की, बीएमसीद्वारे त्यांचे वांद्रे येथील कार्यालयावर केलेली कारवाई अवैध्य होती.

Published by: Meenal Gangurde
First published: September 14, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या