मुंबई, 9 सप्टेंबर : कंगना रणौत मुंबईत आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना वादाला शाब्दिक युद्धाचं स्वरूप आलं आहे. शिवसेना विरुद्ध कंगना हे Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या Tweet ने त्यात भर पडली आहे. आता तर उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.
'मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही', असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली आहे.
'करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते!', असं नवं Tweet करत कंगनाने उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
Come Udhav Thakeray and Karan Johar Gang you broke my work place come now break my house then break my face and body, I want world to see clearly what you anyway do underhand, whether I live or die I will expose you regardless 🙂
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मुंबई महापालिकेनं (BMC) कंगना रणौतच्या ऑफिसवर (kangana ranaut office) हातोडा मारल्यानंतर कंगना संतप्त झाली. मुंबई महापालिकेनं (BMC)कंगनाचं ऑफिस अनधिकृत बांधकाम आहे असं म्हणत बुलडोजरने फोडलं. कंगनाने यानंतर आपल्या ऑफिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचं कंगना म्हणाली आहे.
कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं.
कंगनाच्या मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत पालिकेने मंगळवारी कंगनाला नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यानंतर पालिकेकडून कारवाई सुरू झाली.
अशी झाली युद्धाला सुरुवात
संतप्त कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि सोशल मीडियावर युद्धाला तोंड फुटलं. कंगनाचे समर्थक तिची बाजू घेत असले, तरी मुंबईकर ड्रामा क्वीनवर नाराज झाले. मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा मुंबईला पाकिस्तान असल्याचं म्हटलं. "मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे", असं ट्वीट तिनं केलं.
#DeathOfDemocracy pic.twitter.com/pbLleNulYa
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मुंबईत आल्या आल्याच कंगनाने Video पोस्ट करून आपले इरादे निश्चित केले. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत 'तुमने जो किया अच्छा किया', असं ती म्हणाली.
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
आज हे माझ्याबरोबर झालं. हे कुणाहीबरोबर होऊ शकतं. जागे व्हा. अन्यायाविरुद्ध बोलायला हवं, असंही कंगनाने म्हटलं आहे.