Home /News /entertainment /

अभिनेत्री कंगना रणौतला झटका; Thalaivi बाबत मोठा निर्णय

अभिनेत्री कंगना रणौतला झटका; Thalaivi बाबत मोठा निर्णय

कंगना रणौतची बहुप्रतीक्षित फिल्म थलायवीला (Thalaivi) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे,

    मुंबई, 09 एप्रिल : कोरोनाची (Coronavirus) वाढती संख्या, मिनी लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे बॉलिवूड (Bollywood) तसेच संपूर्ण चित्रपटसृष्टीवर मोठ संकट ओढवलं आहे. अनेक चित्रपट गेल्या वर्षभरापासून प्रदर्शनाच्या रांगेत उभे आहेत. पण लॉकडाऊन तसंच अनेक निर्बंध यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. तर यावर्षीदेथील अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या होत्या पण पुन्हा लॉकडाऊनचं संकट ओढावल्याने पुन्हा एकदा प्रदर्शनाच्या तारखा रद्द झाल्या. त्यातच अभिनेत्री कंगणा रणौतची फिल्म थलायवी’ (Thalaivi) सुद्धा आहे. अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut)  ‘थलायवी’ (Thalaivi) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचीही रिलीज डेट आता पुढे ढकलली आहे. येत्या 23 एप्रिलला चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउनचं सावट तसंच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. यासंदर्भात निर्मात्यांकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. काहीच दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.  प्रेक्षकांनी ट्रेलरला उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता आणि चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. पण आता प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता (Jailalita) यांच्या जीवनावर आधारीत थलायवी हा चित्रपट असून कंगनाला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. याच वर्षी कंगनाला तिच्या ‘मनिकर्णिका’ (Manikarnika) चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार (national awards) मिळाला आहे. तर पुढच्या वेळीही कंगना पुरस्कार मिळवणार असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. हे वाचा -  शरद केळकरला झाला Deja vu; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जाल चक्रावून थलायवीशिवाय 'चेहरे' (Chehre), 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2), 'हाथी मेरे साथी' (Haathi Mere Saathi) तसंच अक्षय कुमारचा (Akshay kumar) बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’ (suryavanshi) ची देखील तारीख बदलली आहे. सूर्यवंशी हा मल्टिस्टारर चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे तारीख लांबणीवर गेली तर आता पुन्हा एकदा चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं आहे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Bollywood News, Kangana ranaut

    पुढील बातम्या