मणिकर्णिका नंतर कंगना साकारणार 'एअरफोर्स पायलट', 'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

मणिकर्णिका नंतर कंगना साकारणार 'एअरफोर्स पायलट', 'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

कंगनाची अपकमिंग फिल्म ‘तेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कंगना एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : अभिनेत्री कंगना रणौतचा पंगा नुकताच प्रदर्शित झाला होता. महिला कबड्डीपटूच्या जीवनावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेहमी वेगळ्या धाटणीच्या आणि विविध विषयांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणारी कंगना आता आणखी एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. कंगनाची अपकमिंग फिल्म ‘तेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कंगना एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. जुलैमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. सर्वेश मेवाडा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून रॉनी स्क्रूवाला याचा निर्माता असणार आहे.

कंगना रणौतच्या टीमने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ‘ज्या आपल्या देशासाठी दररोज त्याग करतात त्या युनिफॉर्ममधील लढवय्या मनाच्या आणि तीक्ष्ण बुद्धीच्या स्त्रियांसाठी, तेजस चित्रपटात कंगना एअरफोर्स पायलटची भूमिका करणार आहे.’ ‘तेजस’च्या पहिल्या पोस्टरवरून यातील कंगनाच्या कणखर भूमिकेचा अंदाज तुम्ही लावू शकता. यामध्ये कंगना खऱ्या अर्थाने एअरफोर्स पायलट वाटते आहे. या फोटोत तिच्या मागे असणाऱ्या जेट फायटरमुळे पोस्टरला एक वेगळा लूक मिळतोय. यामध्ये कंगना एका हातात हेल्मेट घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने उभी आहे.

‘पंगा’च्या प्रमोशनवेळीच कंगनाने ‘तेजस’ बाबत खुलासा केला होता. त्याचप्रमाणे तिने दिलेल्या काही मुखाखतीत तिची बालपणापासूनची एअरफोर्समध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंगनाने या चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग देखील घेतलं आहे. प्रोफेशनल ट्रेनरच्या हाताखाली कंगनाने एअरफोर्स पायलटच्या भूमिकेचे धडे गिरवले आहेत. ‘तेजस’च्या फर्स्ट लूकनंतर आता तिच्या चाहत्यांना ट्रेलरची प्रतीक्षा आहे.

First published: February 17, 2020, 12:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या