VIDEO: नेहमी मीच का देशभक्तीचा पुरावा द्यायचा? कंगना रणौतचा सामान्य माणसांना सवाल

VIDEO: नेहमी मीच का देशभक्तीचा पुरावा द्यायचा? कंगना रणौतचा सामान्य माणसांना सवाल

नेहमी मलाच माझी देशभक्ती का सिद्ध करावी लागते असा सवाल कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशातील कॉमन मॅनला विचारला आहे. तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: कंगना रणौत (Kangana Ranaut) दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. तिने शेतकरी आंदोलनावरुन आत्तापर्यंत प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर यांच्याशी पंगा घेतला आहे. दिलजित दोसांझ आणि कंगनामध्ये रंगलेलं ट्विटरवॉर तर सर्वज्ञात आहे. आता कंगनाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेतकरी आंदोलन हे राजकारणी लोकांच्या प्रेरणेवर चालत आहे असा आरोपही कंगनाने केला आहे.

व्हिडीओ शेअर करत कंगना काय म्हणाली?

"काही दिवसांपासून मला ऑनलाइन लिंचिंगचा सामना करावा लागत आहे" असं कंगनाने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या देशात काय चाललं आहे असा सवाल तिने केला आहे. "माझं माझ्या देशावर प्रेम आहे. पण मला रोज हे सिद्ध का करावं लागतं? मी कोणतंही विधान केलं की मला म्हटलं जातं की तू कोणत्या एका पक्षाच्या बाजूने बोलतेस. पण प्रियांका चोप्रा किंवा दिलजित दोसांझसारखे लोक काय करत आहेत? त्यांना कोणीच काही प्रश्न विचारत नाही. पण माझ्या प्रत्येक हेतूवर शंका घेतली जाते."

कंगनाने नुकतंच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती जयललितांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर कंगना रणौत 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी  कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिच्या टीमने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची आगामी ‘तेजस’ या चित्रपटासाठी भेट घेतली. तसंच तिच्या चित्रपटासाठी तिला आशीर्वाद घेतला आणि हवाई दलाकडून काही आवश्यक परवानग्यादेखील घेतल्या. कंगना रणौतने भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली होते.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या