मुंबई, 13 ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) चित्रपटसृष्टीतील प्रस्थापितांना बोलण्याची एकही संधी हल्ली सोडताना दिसत नाही. स्टार किड्स (Star kids) आणि Nepotism वर तर हटकून बोलते. आता तिने आमिर खानच्या (Amir Khan daughter) मुलीला लक्ष्य केलं आहे. आमिरची मुलगी इरा खानने (Ira Khan) नुकत्याच झालेल्या World Mental Health Day च्या निमित्ताने ती स्वतः नैराश्यात (Depression) होती तेव्हाचा अनुभव शेअर केला होता. त्यावर आता कंगनाने टोमणे मारत वेगळेच तारे तोडले आहेत.
कंगनाने यातूनही आमिर खानला जबाबदार धरलं आहे. इरा खानच्या डिप्रेशनमागे आई-वडील असल्याचा अर्थ कंगनाच्या Tweet मधून सरळ निघतो.
कंगनाने इराच्या VIDEO वर कमेंट करताना लिहिलं आहे की, 'मी स्वतः वयाच्या 16 व्या वर्षी अनेक गोष्टींविरोधात लढत होते. मला मारहाण झाली होती. तशाही अवस्थेत मी एकटी अॅसिड अटॅक झालेल्या माझ्या बहिणीची काळजी घेत होते. आता मीडियाचा हल्ला. डिप्रेशन येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण कुटुंब तुटलेलं असेल तर अशा कुटुंबातल्या मुलांना नैराश्याशी सामना करणं अवघड जातं. पारंपरिक कुटुंब व्यवस्था महत्त्वाची आहे.'
At 16 I was facing physical assault, was single handedly taking care of my sister who was burnt with acid and also facing media wrath, there can be many reasons for depression but it’s generally difficult for broken families children, traditional family system is very important. https://t.co/0paMh8gTsv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
या Tweet वरून कंगनाने आमिर खान आणि रीना यांच्या घटस्फोटाचा थेट उल्लेख केला नसला, तरी तिचं लक्ष्य तेच असल्याचं उघड आहे.
World Mental Health Day बद्दल इराने शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक लाइक्स मिळाल्या होत्या.
नेटकरी कॉमेन्ट्सच्या माध्यमातून इराचं कौतुक करत होते. त्याच वेळी कंगनाचं हे Tweet आलं आहे. या व्हिडीओमधून इरा आपल्या मानसिक अवस्थेबद्दल व्यक्त झाली. "गेल्या 4 वर्षांपासून मी डिप्रेशनमध्ये आहे. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझी मानसिक अवस्था पहिल्यापेक्षा खूपच चांगली आहे". इरा पुढे म्हणाली, अनेक दिवसांपासून मानसिक स्वास्थ्याबद्दल मला काहीतरी करायचं होतं. पण नक्की काय करू हे समजत नव्हतं.
मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant singh rajput case) याची अधिक गांभीर्याने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.
इरा खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी इराचं कौतुक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Kangana ranaut