कंगाना रणौतचा दीपिकाला जाहीर पाठिंबा, ट्विटरवरून ‘छपाक’ला दिल्या शुभेच्छा

कंगाना रणौतचा दीपिकाला जाहीर पाठिंबा, ट्विटरवरून ‘छपाक’ला दिल्या शुभेच्छा

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दीपिकाचा 'छपाक' सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे. अशात कंगना रनौतच्या या व्हिडीओनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत फार कमी वेळा एखाद्या व्यक्तीचं कौतुक करताना दिसत. कंगना सध्या तिचा आगमी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र तरीही तिनं दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाकचं कौतुक केलं आहे आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका आणि मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.

कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःखशी लढण्याची हिंमत देते.'

दबंग 3च्या विलनवर सलमान खान फुल्ल टू इंप्रेस, डायरेक्ट गिफ्ट केली 2 कोटी कार

कंगना पुढे म्हणाली, 'आज मी दीपिका आणि मेघना गुलजार यांचे आभार मानते कारण त्यांनी त्यांनी या मुद्द्यावर सिनेमाची निर्मिती केली. ज्यामुळे त्या मुलींना त्याच्या आयुष्यात हिंमत मिळेल. हा सिनेमा त्या लोकांना मिळालेली चपराक आहे. जे त्यांच्या कामात यशस्वी झाले पण ज्यासाठी त्यांनी हे केलं होतं तो त्यांची हेतू मात्र पूर्णत्वास जाऊ शकला नाही. आज या सिनेमामुळे त्या प्रत्येक चेहऱ्यावर हसू असेल ज्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन या मुलींचा चेहरा खराब केला होता. आशा करते की या नव्या वर्षात अ‍ॅसिड विक्रीवर बंदी यावी ज्यामुळे आपला देश अ‍ॅसिड हल्ल्यापासून मुक्त होऊ शकेल.’

दरम्यान जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणनंही जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेतली. दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी दीपिकाच्याबरोबर कन्हैया कुमारही उपस्थित होता. दरम्यान, दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे.

दीपिकानंतर मराठी स्टारही उतरले मैदानात, JNU हल्ल्याचा केला निषेध

काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. 'छपाक' सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली. अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे. अशात कंगना रनौतचा हा व्हिडीओ दीपिकाचं बळ वाढवताना दिसत आहे. याआधी कंगनाची बहीण रंगोली चंडेलनंही दीपिकाच्या या सिनेमाचं कौतुक करत सोशल मीडियावरुन तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

#boycottchhapaak ट्वीटरवर ट्रेंड, दीपिका JNUमध्ये गेल्यामुळे नेटकरी भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 10:13 AM IST

ताज्या बातम्या