Home /News /entertainment /

VIDEO: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर बोलली कंगना रणौत, म्हणाली.....

VIDEO: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर बोलली कंगना रणौत, म्हणाली.....

सध्या देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद (Gyanvapi Masjid Case) सुरु आहे. मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर हिंदू पक्षाच्यावतीने शृंगार गौरीची नियमित पूजा आणि इतर देवतांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या वादादरम्यान बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई,19  मे- सध्या देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद (Gyanvapi Masjid Case) सुरु आहे. मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर हिंदू पक्षाच्यावतीने शृंगार गौरीची नियमित पूजा आणि इतर देवतांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या वादादरम्यान बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत   (Kangana Ranaut)  आपल्या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. तिचा आगामी चित्रपट 'धाकड'   (Dhaakad)  रिलीज होण्यापूर्वी तिने बाबा विश्वनाथचं दर्शन घेतलं आहे. जिथे तिने आपल्या टीमसोबत पूजादेखील केली. देशात सुरू असलेल्या या वादावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया देत ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर आपलं मत मांडलं आहे. 'धाकड' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने ज्ञानवापी मशीद वादावर आपलं मत मांडलं आहे. मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर तिला प्रश्न विचारला असता तिने म्हटलं, ‘काशीच्या प्रत्येक कणा-कणात महादेव वसला आहे’. कंगना रणौत म्हणाली, 'जसं भगवान कृष्ण मथुरेच्या प्रत्येक कणात आहे, प्रभू राम अयोध्येच्या प्रत्येक कणात आहे, त्याचप्रमाणे काशीच्या प्रत्येक कणा-कणात महादेव आहे. त्यांना कोणत्याही रचनेची गरज नाही.’ यासोबतच अभिनेत्रीने हर हर महादेवचा जयघोषादेखील केला. कंगनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कंगनाची देवावर खूप श्रद्धा आहे. आणि तिने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे.कंगना बुधवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईहून वाराणसीला पोहोचली होती. तिच्या टीमसह, ती संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर पोहोचली आणि बाबा काशी विश्वनाथ यांचे विधिवत दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. रात्री उशिरा अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोही शेअर केले आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Kangana ranaut

    पुढील बातम्या