माझी खूप अफेअर्स झाली, माझं प्रेम शारीरिक नाही,अध्यात्मिक आहे - कंगना राणावत

माझी खूप अफेअर्स झाली, माझं प्रेम शारीरिक नाही,अध्यात्मिक आहे - कंगना राणावत

या कार्यक्रमादरम्यान, 'मी मोदींची फॅन आहे. आज एक चहावाले पंतप्रधान झालेत. हा लोकशाहीचा विजय आहे' असं कंगना राणावत म्हणाली.

  • Share this:

18 मार्च : नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत न्यूज18 चा राइजिंग इंडिया समिट पार पडला. या राजकीय वर्तुळातून त्याचबरोबर बॉलिवूड आणि अन्य क्षेत्रांतून अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. त्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतही उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान, 'मी मोदींची फॅन आहे. आज एक चहावाले पंतप्रधान झालेत. हा लोकशाहीचा विजय आहे' असं कंगना राणावत म्हणाली.

माझी खूप अफेअर्स झाली आहेत. प्रत्येक ब्रेकअपनंतर मला वाटायचं माझं लव्ह लाईफ संपलं. पण माझं प्रेम शारीरिक नाही, अध्यात्मिक आहे. मी हृतिकचा किस्सा मागे सोडून दिला आहे. असं म्हणत कंगनाने तिच्या भावना दिलखूलासपणे सगळ्यांच्या समोर मांडल्या.

१६ ते ३१ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये प्रत्येक वेळा मलाच डम्प केलं, मी कधीच कुणाला डम्प केलं नाही, आणि आता असं वाटतंय, या लुझरने मला डम्प केलं. असं म्हणत कंगनाने तिची लव्ह लाईफ सगळ्यांसोबत शेअर केली.

मी कोणालाच धोका दिला नाही. मलाच दर वेळी फसवलं गेलंय. मला सोडून गेलेला परत येतो. पण त्यावेळी माझ्या सोबत अजून एक लूझर असतो. असंही ती या समिट दरम्यान म्हणाली.

First published: March 18, 2018, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading