मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसांठी कंगनाची खास पोस्ट म्हणाली...

Kangana Ranaut : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसांठी कंगनाची खास पोस्ट म्हणाली...

 बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रणौतनं देखील द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत भारताच्या नव्या राष्ट्रपातींचं कौतुक केलं आहे.

    मुंबई, 22 जुलै : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu President of India) या स्वतंत्र भारताच्या 15व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. 25 जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर त्या पदभार स्वीकारतील. त्यामुळे सध्या त्यांच्यावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत असलेला पहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रणौतनं देखील द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत भारताच्या नव्या राष्ट्रपातींचं कौतुक केलं आहे. कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा फोटो शेअर केला. 'भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (देशातील सर्वोच्च पदावर पोहोचणारी आदिवासी पार्श्वभूमीतील पहिली व्यक्ती), भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, अभिनंदन महोदया द्रौपदी मुर्मू. असं म्हणत कंगनानं नव्या राष्ट्रपतींचं कौतुक केलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये द्रौपदी मुर्मूचे विजयाबद्दल अभिनंदन करताना कंगनानं स्त्री शक्तीचा उल्लेख केला. तिनं ठेवलेली स्टोरी सध्या अनेकांचं लक्ष वेधत असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा -  Koffee With Karan 7: घटस्फोटावर अखेर संमथाने सोडलं मौन, सांगितलं X-पती समोर येताच काय होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते संपूर्ण देश द्रौपदी मुर्मूचे अभिनंदन करत आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूड स्टार्सनीही देशाच्या नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रणौत, अनुष्का शर्मा, तमन्ना भाटिया, अनुपम खेरपासून ते गीतकार मनोज मुंतशीरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाबद्दल खास पोस्ट आणि त्यांची शैली शेअर केली. द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 6,76,803 मतांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. जे एकूण मतांच्या 64.03 टक्के होते. त्याचवेळी त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना एकूण 3,80,177 मते मिळाली. जे एकूण मतांच्या 36 टक्के होते. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा मोठ्या फरकानं विझय झाला आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Bollywood, Kangana ranaut, Politics, Social media

    पुढील बातम्या