आलिया, करणनंतर रंगोली चंडेलचा 'या' अभिनेत्रीवर हल्लाबोल, म्हणाली...

आलिया, करणनंतर रंगोली चंडेलचा 'या' अभिनेत्रीवर हल्लाबोल, म्हणाली...

आजकाल कंगनाची बहीण रंगोली चंडेलही प्रत्येक ठिकाणी कंगनाला पाठिंबा देताना दिसते.

  • Share this:

मुंबई, 12 मे : अभिनेत्री कंगना रनौत सध्या कोणत्या ना कोणत्या कारणानं किंवा वादामुळे सतत चर्चेत असते. पण आजकाल कंगनाची बहीण रंगोली चंडेलही प्रत्येक ठिकाणी कंगनाला पाठिंबा देताना दिसते. मागच्या काही दिवसात तिनं रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर आणि ऋतिक रोशन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता तिनं आपला मोर्चा अभिनेत्री ऋचा चढ्ढाकडे वळवला आहे.

काही दिवसांपूर्वी ऋचानं कंगनाला उद्देशून, 'मी सर्वांसमोर शाब्दिक भांडणवर विश्वास ठेवत नाही. जर मला एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार असेल तर मी त्यांच्या समोर जाऊन बोलेन.' असं म्हटलं होतं.

ऋचाच्या या वक्तव्यावर कंगनानं काहीच प्रतिक्रिया दिली नसली तरीही तिची बहीण रंगोलीनं मात्र ऋचाला बेरोजगार अभिनेत्री म्हणत तिच्यावर टीका केली आहे. रंगोलीनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुन खूप सारे ट्वीट केले. ती म्हणते, मी ऐकलं आहे की, ऋचा चढ्ढासारख्या अनेकांना कंगनाचं स्पष्ट बोलणं खटकतं. त्यांच्यामते ते सार्वजनिक ठिकाणी बोलणं चुकीचं आहे. पण मी त्यांना विचारते, तुमच्याकडे आणखी कोणताही पर्याय आहे का ? तुम्ही स्वतःच्या हिंमतीवर काही केलं आहे का ?

रंगोलीनं पुढे ट्वीट केलं, जर बॉलिवूडमधील ताकदवान लोक यांना ब्लॅकलिस्ट करतील तर हे या ठिकाणी टिकून राहू शकतील का ? हे लोक स्वतःचा कंटेट तयार करून स्वतःच पोट भरू शकतात का ? यातील कोणीच विरोधकांचा सामना करू शकत नाहीत आहे जिंकू शकत नाहीत. त्यमुळे ज्या नव्या मुली  बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत त्यांना मी सांगेन की, पहिलं स्वतःच्या पायावर उभं राहा आणि नंतर ही लढाई लढण्याचा विचार करा.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार या लढाईमध्ये हारले पण कंगना ही लढाई जिंकली कारण तिनं 14 व्या वर्षांपासून स्वतःच्या मेहनतीनं स्वतःला तयार केलं आहे. असंही रंगोलीनं एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कंगना सध्या तिच्या 'मेंटल है क्या'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिचा 'पंगा' सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

3 वर्षांपूर्वी आई बनली होती एकता कपूर, चाहत्यांपासून लपवलं होतं 'हे' गुपित

न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड

Mother's Day: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे हे कधीही न पाहिलेले फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading